scorecardresearch

सारा अली खान मेकअप करत असतानाच चेहऱ्याजवळ फुटला बल्ब; पाहा व्हिडीओ

याचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. मात्र तिच्या चित्रपटाच्या सेटवरील मेकअप रुममध्ये एक अपघात झाला आहे. यामुळे ती फारच घाबरली आहे. सारा ही मेकअप रुममध्ये टचअप करत असताना अचानक तिच्या चेहऱ्यावरील बल्ब फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे.

सारा अली खान ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच सारा अली खानने तिच्या मेकअप रुममधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी तिच्यासोबत झालेला अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडीओनुसार, सारा अली खान ही टच अप करताना दिसत आहे. यावेळी ती म्हणते की जितूला सांगा दोन नारळपाणी घेऊन ये. यानंतर मेकअप आर्टिस्ट तिचा टचअप करुन बाजूला होते. यानंतर ती तिचा मेकअप बरोबर झाला की नाही, हे आरसामध्ये पाहत असते.

मात्र त्याचवेळी बाजूला असलेला एक बल्ब चेहऱ्याजवळ फुटतो. त्याच्या आवाजाने सारा दचकते आणि घाबरते. यामुळे तिचा मोबाईलही पडतो. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत त्यावर ‘अशी सकाळ असे म्हटले आहे. त्यासोबत काही इमोजीही तिने पोस्ट केले आहेत. तिच्या या व्हिडीओद्वारे ती किती घाबरली होती, याबद्दलही तिने सांगितले आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनसने बाळासाठी सरोगसीचा पर्याय का निवडला? समोर आले कारण

दरम्यान सध्या सारा ही विकी कौशलसोबत लुका छुपी २ या चित्रपटाचे शूटींग करत आहे. तो सध्या इंदोरमध्ये असून चित्रपटाच्या सेटवरील या दोघांचे बरेच फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sara ali khan scary experience in make up room as bulb explodes near her face while taking touch up video viral nrp