अभिनेत्री सारा अली खान तिच्या फिटनेसाठी पुरेपूर प्रयत्न करतना दिसते. अनेकदा सारा तिचे वर्कआउट करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तर साराला बऱ्याचदा तिच्या जिमबाहेर स्पॉट केलं जातं. करोनाचा वाढता प्रादूर्भाव असतानाही सारा फिटनेसकडे दूर्लक्ष करत नाहीय. नुकतच साराला तिच्या जिमबाहेर स्पॉट करण्यात आलं. यावेळी साराने असं काही केलं की ती नेटकऱ्यांकडून चांगलीच ट्रोल झाली आहे.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साराचे काही जिमबाहेरील फोटो पोस्ट केले आहेत. साराचे जिम बाहेरील हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. सारा जेव्हा जिम बाहेर आली तेव्हा पैपराजी फोटोसाठी तिच्या जवळ गेले. यावेळी सारा जोरात ओरडली आणि म्हणाली “माझ्या जवळ येऊ नका.” मास्क न घातल्याने सारा फोटोग्राफर्सना जवळ येण्यास रोखत होती.
View this post on Instagram
मात्र साराच्या या फोटोवर आता युजर्सनी तिला मास्क न घातल्याने ट्रोल कऱण्यास सुरुवात केली आहे. तिच्या फोटोवर एका युजरने म्हंटलं आहे, ” आणि ही लोकांना मास्क घालायला आणि सोशल डिस्टंसिंग शिकवते, काम नसेल तर बाहेर निघू नये असंही सांगते. तर काही युजर्सनी तिला मास्क कुठे असा प्रश्न विचारला आहे.
सारा अली खान लवकरच अक्षय कुमार आणि धनुषसोबत ‘अतरंगी रे’ या सिनेमात झळकरणार आहे. या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं असून आता या सिनेमाच्या ट्रेलरची झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.