अभिनेत्री करीना कपूर खानचा आज ४२वा वाढदिवस आहे. बॉलिवूडकर आणि चाहत्यांकडून करीनावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. करीना आजचा दिवस कुटुंबियांबरोबर घालवत आहे. मलायका अरोरा, अमृता अरोरा, नीतू कपूर, कुणाल खेमू, सबा पतौडी, सोहा अली खान आणि इतर अनेक जणांनी करिनाला तिच्या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अशातच करीनाचा पती सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी व अभिनेत्री सारा अली खान हिने सावत्र आई करीनाला दिलेल्या शुभेच्छा चर्चेत आहेत.  

अभिनेत्री सारा अली खानचे सावत्र आई करीना कपूर खानशी नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. दोघींच्या नात्यातील गोडवा दर्शवणाऱ्या शुभेच्छा आज साराने करीनाला दिल्या. साराने करीना, जेह अली खान आणि वडील सैफ अली खान यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आणि करीनाला टॅग करत लिहिलं की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला आज खूप सारं प्रेम, हास्य, आनंद आणि केक मिळू देत! तुमचे .येणारे वर्ष चांगले जावो, अशी मी आशा करते!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
sara-ali-khan-wishes
साराने करीनाचा इन्स्टाग्राम स्टोरीत फोटो पोस्ट करत दिल्या शुभेच्छा (फोटो – इन्स्टाग्राम स्क्रीनशॉट)

दरम्यान, करीना कपूर खान अखेरची अभिनेता आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसली होती. यामध्ये तिने आमिरबरोबर मुख्य भूमिका केली होती. लवकरच ती जयदीप साहनी आणि विजय वर्मा यांच्याबरोबर सुजॉय घोषच्या डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्समधून ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे. तिने अलीकडेच एक इन्स्टाग्राम स्टोरी अपलोड करत याबद्दल माहिती दिली होती.