शिवानी सुर्वे होणार ‘सातारच्या सलमान’ची हिरोइन

या चित्रपटात शिवानी बोल्ड, बिनधास्त मुलीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे

शिवानी सुर्वे

‘बिग बॉस मराठी २’मुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी सुर्वे. बिग बॉसचं विजेतेपद न पटकावतादेखील शिवानी चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय झाली. तिच्या याच लोकप्रियतेमुळे ती लवकरच ‘सातारचा सलमान’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये ती मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. काही दिवसापूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला.

‘स्वप्नं बघितली तरच खरी होतात !!’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘सातारचा सलमान’या चित्रपटामध्ये सुयोग गोऱ्हेची प्रमुख भूमिका असून शिवानी सुर्वे त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या दोघांसोबतच ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सायली संजीवही झळकणार आहे.

काही दिवसापूर्वी ‘सातारच्या सलमान’मधील या दोन्ही अभिनेत्रींच्या भूमिकेवरील पडदा दूर सारण्यात आला. या चित्रपटामध्ये शिवानीने दीपिका भोसले या बोल्ड, बिनधास्त मुलीची भूमिका साकारली आहे. तर सायली माधुरी माने या निरागस, सोज्वळ मुलीच्या रुपात पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, प्रकाश सिंघी निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन हेमंत ढोमे यांनी केले आहे. हेमंत ढोमे यांनी मराठी सिनेसृष्टीत नेहमीच नाविन्यपूर्ण विषय हाताळले आहेत, त्यामुळे या चित्रपटातही प्रेक्षकांना काहीतरी धमाकेदार, भन्नाट पाहायला मिळणार, हे नक्की. हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Satarcha salman released shivani surve poster marathi movie ssj

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या