देशातली करोना बाधितांची संख्या वेगाने वाढताना दिसत आहे. सामान्य लोकांसोबतच अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीसुद्धा करोनाबाधित आढळून येत आहेत. करोनाबाधित सेलिब्रिटींच्या या यादीत अजून एक नाव आता समाविष्ट झालं आहे ते म्हणजे सतिश कौशिक. त्यांनी स्वतः सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. सतिश कौशिक यांनी ट्विटरवरून पोस्ट करत आपल्या चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे.

त्याबरोबर सतिश यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना करोना चाचणी करून घेण्याचं आवाहनही केलं आहे.

सतिश म्हणतात, माझा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील, त्या सर्वांनी करोना चाचणी करुन घ्यावी अशी विनंती करतो. मी गृह विलगीकरणात आहे. तुमचं प्रेम, शुभेच्छा, आशिर्वाद यांची मदत होईल. धन्यवाद.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकार करोनाबाधित असल्याची माहिती मिळत आहे. यात रणबीर कपूर, संजय लील भन्साळी, मनोज वाजपेयी, सिद्धातं चतुर्वेदी, आशिष विद्यार्थी, उमेश कामत, प्रिया बापट अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे. करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. महाराष्ट्रात या विषाणूचा प्रभाव सर्वाधिक असल्याचं दिसून येत आहे.