हिंदी सिनेमाचं वर्णन केलेलं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे, ‘सत्यजित रे यांचे चित्रपट न पाहणं म्हणजे चंद्र-सूर्याच्या दर्शनाशिवाय जगणं’ असं प्रख्यात दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांनी म्हटलंय. 1950 च्या दशकात भारतीय सिनेमाला जगाच्या नकाशावर आणणारे बंगालचे दिग्गज दिग्दर्शक सत्यजित रे… त्यांची पहिली डेब्यू फिल्म ‘पथेर पांचाली’ ज्यावेळी कान्स, बर्लिन, सॅन फ्रान्सिस्को, रोम, बाफ्टा यांसारख्या बड्या फिल्म फेस्टीव्हलमध्ये झळकली, त्यावेळी या फिल्मने जगाच्या पाठीवर भारतीय सिनेमांची वेगळी छाप पाडली. भारतीय सिनेमाच्या प्रवासाचा आढावाच अशक्‍य इतकं माहात्म्य या सिनेमानं मिळवलं.

 

सत्यरिज रें नी घडवले आधुनिक भारताचं दर्शन घडवणारे चित्रपट

सत्यजित रे यांच्या ‘अपराजितो’ आणि ‘अपूर संसार’सह अपू ट्रायलॉजी म्हणून गाजलेल्या मालिकेतील ‘पथेर पांचाली’ या चित्रपटांनी युरोप आणि अमेरिकेतील सिनेमांना तगडं आव्हान दिलं होतं. इतकंच नव्हे तर ‘पथेर पांचाली’ हा भारतीय सिनेमा न्यूयॉर्कच्या थिएटरमध्ये जवळजवळ आठ महिने चालला होता. स्टोरी टेलिंगचं आगळं तंत्र त्यांनी रूढ केलं, ज्याचा प्रभाव जगातील अनेक सिनेकृतींवर झालेला दिसेल. त्यांची ही कारकीर्द १९७० च्या दशकांपर्यंत मर्यादित न राहता त्यांनी व्यवसायिक हिंदी सिनेमांची एक व्याख्याच निर्माण केली होती.

सिनेमाला जमिनीशी जोडणारी, मानवी भावभावना व जगण्याची नितांत सुंदर नक्षी रुपेरी पडद्यावर चितारणारण्याची किमयागार सत्यजित रे यांच्याकडे होती. याला ‘गुरु दत्त प्यासा’, ‘कागज के फूल’ किंवा ‘बिमल रॉयस’, ‘दो बिघा जमीन’ हे चित्रपट अपवाद आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक बाजूंनी ज्यांच्या कामाची प्रसंशा झाली आहे, असे किमयागार सत्यजित रे यांना आर्थिक संकटाचा देखील सामना करावा लागला होता. अतिशय साधारण आणि मर्यादित उपकरणांच्या मदतीने सिनेमा घडवून झापडबंद कल्पनांच्याही पलिकडचं सौंदर्यशास्त्र सत्यजित रे यांनी मांडलं.

सुमारे चार दशकं ते रसिकांना आशयघन मेजवानी देत राहिले. साधी सरळ कथा, त्यातल्या माणसांचं नैसर्गिक जगणं, तितक्‍याच सादगीनिशी रे मांडत असत. सिनेमा संथ वाटला तरी ते कुरोसावाच्या शब्दात सांगायचं तर मोठं नदीपात्र संथपणे वाहतं तसंच असतं. त्यांच्या चित्रपटात साधेपणा होता. अतिशय कमी खर्चात तयार होणारा त्यांचा सिनेमा आशयाच्या दृष्टीने मात्र जागतिक दर्जाचा होता. मानवतावादी सत्यजित रे हे कोणत्याही परिस्थितीकडे अतिशय सहानुभूतीने पाहत होते. निंदा करणं त्यांच्या स्वभावातंच नव्हतं.

हिंदी सिनेमांमधली नवी लाट

आज बॉलिवूडमध्ये हमखास पैसा वसूल आणि सुपरहिट चित्रपट येत असले तरी भारतीय सिनेमाची व्याख्या सत्यजित रे यांच्याशिवाय अपूर्णच आहे. २००० च्या दशकात हिंदी सिनेमा क्षेत्रात एक नवी लाट आली आणि इतर दिग्ददर्शक सत्यजित रे यांच्या शैलीला आत्मसात करू लागले. यात दिवाकर बनर्जी, विशाल भारद्वाज, अनुराग कश्यप, अनुराग बासु, मीरा नायर, नीरज घायवान आणि रितेश बत्रा यांसारखे दिग्दर्शक उभे राहू लागले. हिंदी सिनेमांमधली भाषा सुद्धा वेगळं रूप धारण करू लागली.

Satyajit Ray Hindi Cinema
Still from Pather Panchali

दिग्दर्शक अनुराग बासू म्हणाले होते, “त्यांच्या तरूणपणात त्यांचे आई-वडील सत्यजित रे यांच्या चित्रपटांशिवाय कोणतेच चित्रपट पाहू देत नव्हते.” ‘फायर अ‍ॅण्ड वॉटर’ या चित्रपटातील बोल्ड सीन्समुळे प्रसिद्ध असलेली अभिनेत्री दीपा मेहता म्हणते, “महिलांवरील आधारित चित्रपट करताना सत्यजित रे यांचा ‘चारूलता’ हा चित्रपट नेहमीच प्रेरणा देत असतो. ‘लुटेरा’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी सुद्धा सत्यजिर रे यांच्या चित्रपटाने मी प्रेरित झाले होते.” विशाल भारद्वाज यांच्या ‘कमीने’ चित्रपटा सुद्धा सत्यजित रे यांच्या शैलीची झलक पहायला मिळते.

Satyajir-Ray-Lootera
Sonakshi Sinha and Ranveer Singh in Lootera

सत्यजित रे यांनी त्यांच्या चित्रपटातील पात्रांच्या संवादातून वेगवेगळ्या शहराची वेगळी ओळख निर्माण केली होती. सत्यजित रे यांची ही शैली संजय घोष यांच्या चित्रपटातून झळकताना दिसून येते. संजय घोष यांनी त्यांच्या ‘कहाणी’ मध्ये कोलकत्ता शहराला रोमॅण्टिक न दाखवता कोलकातामधील आत्महत्याची समस्या त्यांनी मांडली. सत्यजित रे यांचे चित्रपट स्वतःला प्रभावित करत असल्याचं अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी सुद्धा म्हटलंय. रितेश बत्रा यांच्या ‘लंचबॉक्स’ आणि ‘फोटोग्राफ’ हे चित्रपट सुद्धा सत्यजित रे यांच्या धाटणीचे वाटू लागतात. यात मानवी भावना हुबेहूब टिपले गेले आहेत. त्यामुळे आजच्या काळातील चित्रपटात सुद्धा सत्यजित रे यांच्या किमया झळकत आहेत.

Satyajir-Ray-Netflix
Stills from Ray, Netflix India anthology series

सत्यजित रे यांनी घडवलेल्या वास्तवदर्शी चित्रपटापासून आजची तरूण पिढी दूर चालली आहे. चित्रपट निर्मितीच्या प्रेरणा गल्लाभरू सिनेमाच्याच्या दिशेने वाटचाल करू लागल्या आहेत. सत्यजित रे यांचा हाच वारसा आजच्या तरूण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी नेटफ्लिक्सने एंथोलॉजी सीरिज ‘रे’ हा एक छोटा प्रयत्न केलाय. त्यांच्यावर आधारिक चार कहाण्या घेऊन ‘रे’ ही सीरिज तयार केली आहे. त्यामूळे आजच्या पिढीमध्ये या सीरिजच्या माध्यमातून ‘सत्यजित रे’ कशा प्रकारे रूजतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.