बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. जॉनचे लाखो चाहते आहेत. नुकताच जॉनचा ‘सत्यमेव जयते २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. २०१८ मध्ये ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटाची लोकप्रियता पाहता हा सिक्वल बनवण्यात आला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर देशभरातील चित्रपटगृह आज हाऊसफूल होती.

प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरु केली आहे. एक नेटकरी म्हणाला, “हा चित्रपट अप्रतिम आहे. या चित्रपटात थोड्या थोड्या वेळात आपल्याला आश्चर्याचे धक्के बसतात. या चित्रपटानंतर जॉनच्या चाहत्यांमध्ये नक्कीच वाढ होणार आहे. त्यासोबत दिव्याची या चित्रपटातली भूमिका पसंतीस उतरली आहे.” दुसरा नेटकरी म्हणाला, “हा चित्रपट सुपर फ्लॉप चित्रपट आहे. दिव्या खोसलाला अभिनय येत नाही. वेड्या लोकांसारखा गरज नसताना जॉन लोकांना मारत आहे.” तिसरा नेटकरी म्हणाला, “सत्यमेव जयते २ हा चित्रपट खराब आहे. प्रत्येक फ्रेम आणि वाक्य हे कवितेसारखे जोडण्यात आले आहेत. माझं डोकं अजूनही दुखतयं. जॉन तुझ्यात असलेली प्रतिभा अशा फालतू चित्रपटांमध्ये वाया घालवू नको.” या चित्रपटाला काही मिश्र प्रतिसाद देण्यात आला आहे. काहींना हा चित्रपट आवडला तर काहींना हा चित्रपट आवडला नाही.

आणखी वाचा : निलेश साबळेने पाया पडून मागितली नारायण राणेंची माफी; जाणून घ्या कारण

आणखी वाचा : प्रियांका होणार आई? निकसोबत चाहत्यांनाही बसला धक्का

या चित्रपटात जॉन ३ भूमिका साकारताना दिसत आहे. तर अभिनेत्री दिव्या खोसला कुमार मुख्य भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण गे मिलन जावेरी यांनी केले आहे. त्यासोबत या चित्रपटाची कहानी देखील त्यांनीच लिहिली आहे.

Story img Loader