बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर गेल्या अनेक दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. स्वराने केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. तिने हिंदुत्ववाद्यांची तुलना तालिबानशी केली होती. त्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर #ArrestSwaraBhasker हा ट्रेंड सुरू केला होता. हिंदुत्ववाद्यांची तुलना तालिबानशी करणारं ट्वीट आता स्वराला महागात पडण्याची शक्यता आहे. कारण देशभरात विविध ठिकाणी स्वरावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता स्वराने तिच्या इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिचे मत मांडले आहे.

शनिवारी स्वराने तिच्या इनस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत तिचे मत मांडताना दिसली. तिने त्या पोस्टमध्ये लिहिले की, “सोशल मीडिया हे एक व्हर्चुअल, सार्वजनिक ठिकाण आहे. जसे रस्त्यावर रेस्टॉरंट आहेत. मात्र सार्वजनिक ठिकाणी जसा शिष्टाचार आणि सभ्यता बाळगली जाते तसं सोशल मीडियावर पाळत नाहीत. मी फक्त एका फुलाचे चित्र पण पोस्ट करू शकत नाही आणि जर पोस्ट केलं तरं त्याचे कनेक्शन वीर दी वेडिंगच्या हस्तमैथुन दृश्याशी केलं जाते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)


स्वराने  शेअर केलेल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, ” हे खूप चुकीचे, अश्लील आणि सायबर लैंगिक छळ आहे. मला असं वाटत की याला कोणीही बळी पडू नये आणि ऑनलाइन ट्रोलिंग करुन मला कोणी ही रोखू शकत नाही. या व्हर्चुअल पब्लिक प्लेसला नकारात्मकता पसरवण्यासाठी वापरू शकत नाही.” स्वराची ही  पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय होत आहे. नेटकरी तिच्या कमेंट सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. स्वराने यापूर्वी देखील ट्रोलर्सना चोख उत्तर दिले असले तरी तिला ते कठीण असते असे तिने संगीतले. तिने  ‘इ-टाइम्स’शी बोलताना सांगितले होते की, “तुम्ही एखाद्या सामाजिक समस्येबद्दल बोलता तेव्हा दररोज सकारात्मकतेने ट्रोलर्सचा सामना करणे कठीण असते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

स्वराच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, स्वरा शेवटची ‘शीर कोरमा’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकली होती. याच बरोबर तिने अनेक वेब सीरिजमध्ये आणि शॉर्ट फिल्म्समध्ये काम केले आहे. लवकरच ती ‘जाहां चार यार’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे.