scorecardresearch

‘बाबाच्या नावाची गोधडी…’ वडिलांच्या आठवणीत सायली संजीवची भावुक पोस्ट

सायली संजीवनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेली ही पोस्ट बरीच चर्चेत आहे.

sayali sanjiv, sayali sanjiv emotional post, sayali sanjiv instagram, sayali sanjiv emotional post for father, सायली संजीव, सायली संजीव इन्स्टाग्राम, सायली संजीव भावुक पोस्ट
नुकतीच सायलीनं तिच्या इन्स्टाग्रामवर वडिलांच्या आठवणीत एक खास पोस्ट शेअर केली आहे

मराठी मालिका आणि त्यानंतर चित्रपटातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव हिच्या वडिलांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली होती. सायलीचे वडील हे आजारी होते. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. ३० नोव्हेंबर २०२१ ला सायलीच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. नुकतीच सायलीनं तिच्या इन्स्टाग्रामवर वडिलांच्या आठवणीत एक खास पोस्ट शेअर केली आहे.

सायलीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या हातात एक गोधडी दिसत आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, ‘संजीव’ बाबाच्या नावाची गोधडी @motherquilts_india @ghongadi_india किती आभार मानू मी तुमचे? आता मी हक्काने तुमच्याकडून गोधडी बनवून घेणार… मुन्नाबी ताई, तुम्ही माझ्यासाठी ही गोधडी स्वतःच्या हातानं विणली. तुमच्या हातात जादू आहे..’ सायलीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे.

आणखी वाचा- “कुणीतरी पडला ना की बातमी रंगते…” ‘तमाशा लाईव्ह’चा थरारक टीझर पाहिलात का?

दरम्यान वडिलांच्या निधनानंतर सायलीनं त्यांच्यासोबतचा फोटो शेअर करताना एक इमोशनल पोस्ट शेअर केली होती. “संजीव २६/०७/१९५८ – ३०/११/२०२१. तुला माहित आहे नं बाबा माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं, आहे आणि कायम असेल.. या जगात सगळ्यात जास्त.. तू आयुष्य आहेस माझं. दैव होता तू, देव होता तू, खेळण्यातला माझा खेळ होता तू.., शहाणी होते मी, वेडा होता तू, माझ्या साठी कारे सारा खर्च केला तू.., आज तू फेडुदे पांग हे मला, जगण्या रे मला अजूनही तूच हवा.. बाबा, थांब ना रे तू, बाबा जाऊ नको दूर…”

आणखी वाचा- सलमान खानच्या घरी यंदा होणार नाही ईद सेलिब्रेशन, वाचा काय आहे कारण

वडिलांच्या निधनानंतर सायली संजीवनं त्यांच्यासाठी लिहिलेली ही पोस्ट त्यावेळी बरीच व्हायरल झाली होती. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत सायलीला धीर दिला होता. आता सायली या दुःखातून हळूहळू सावरत असून तिनं पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती प्रेक्षकांसोबत शेअर करत असते. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा’ आणि ‘पाँडेचरी’ या चित्रपटांमध्ये ती दिसली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sayali sanjiv emotional post on instagram about her father goes viral mrj

ताज्या बातम्या