ड्रग्ज प्रकरणाचा आर्यन खानला धसका, पूर्वपदावर आणण्यासाठी शाहरुख आणि गौरीची विशेष तयारी

गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानचा जामीन मंजूर केला होता.

मुंबई ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तब्बल २६ दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर आला आहे. न्यायालयातून जामीन मिळूनही कारागृह प्रशासनापर्यंत कागदपत्रे वेळेत न पोहोचल्याने आर्यन खानला आणखी एक रात्र मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात काढावी लागली. मात्र, शनिवारी तो तुरुंगातून बाहेर आला. न्यायालयाचा आदेश प्राप्त करण्यासाठी आर्थर रोड कारागृहातील बेल बॉक्स आज पहाटे ५.३० वाजता उघडण्यात आला. आर्यनला नेण्यासाठी शाहरुख खान जेलबाहेर उपस्थित होता. जेलमध्ये इतके दिवस जेलमध्ये राहिल्यामुळे आर्यनला जबर धक्का बसला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळेच शाहरुख आणि गौरीने मिळून त्याच्यासाठी एक स्पेशल डाएट प्लॅन तयार केला आहे. या डाएट प्लॅनमध्ये काऊन्सिलिंगपासून हेल्थ चेकअपपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे.

एक आई-वडील म्हणून शाहरुख खान आणि गौरी खान यांना या प्रकरणाचे गांभीर्य फार चांगल्या प्रकारे माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मुलासाठी खास रूटीन चार्ट बनवला आहे. इतक्या लहान वयात तुरुंगात जाणे, वादात सापडणे, यासारख्या गोष्टींमुळे एखाद्याच्या मानसिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. यामुळे आर्यनचे आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी शाहरुख आणि गौरीने विशेष तयारी केली आहे. यामुळे आर्यन खानला जेल आणि ड्रग्ज प्रकरणातून मानसिकरित्या लवकरात लवकर बाहेर पडण्यास मदत मिळू शकेल.

‘बॉलिवूड लाईफ’ या वेबसाईटला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खान हा घरी पोहोचल्यानंतर सर्वात आधी त्याच्या अनेक आरोग्य तपासण्या केल्या जाणार आहेत. यावेळी त्याच्या पोषणाची आणि चांगल्या आहाराची पूर्ण काळजी घेतली जाईल. तसेच आर्यनची रक्त तपासणीही केली जाणार आहे. आर्यन हा फार लहान वयात तुरुंगात राहिल्याने त्याच्या तब्येतीवर बराच परिणाम झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे ही विशेष तयारी करण्यात आली आहे.

आर्यन खानने तुरुंगात काहीही नीट खाल्लेले नाही. त्यामुळे गौरीला तिच्या मुलाच्या प्रकृतीची प्रचंड चिंता वाटत आहे. यामुळे पोषणतज्ञांच्या सल्ल्यानुसार आर्यनसाठी विशेष आहार तयार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे शारीरिक तपासणीसोबतच आर्यनच्या मानसिक आरोग्याचीही काळजी घेतली जाणार आहे. आर्यनसाठी विशेष काऊन्सलिंग सेशन आयोजित करण्यात आले आहे. यामुळे त्याला यातून बाहेर पडण्यास मदत होणार आहे. यादरम्यान आर्यनला पार्ट्यांपासून दूर ठेवले जाणार आहे.

Video : आर्यन खानला पाहण्यासाठी मन्नतवर चाहत्यांची तुफान गर्दी

दरम्यान, गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानचा जामीन मंजूर केला होता. शाहरुखची मैत्रीण आणि अभिनेत्री जुही चावला शुक्रवारी संध्याकाळी २३ वर्षीय आर्यनच्या जामिनासाठी ड्रग्जशी संबंधित खटल्याची सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस कोर्टात हजर झाली. हायकोर्टाने शुक्रवारी आपल्या आदेशाचा मुख्य भाग उपलब्ध करून दिला ज्यामध्ये आर्यन खान आणि या प्रकरणातील सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यावर १४ अटी घालण्यात आल्या आहेत. तिघांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जामीनदारावर आणि तत्सम रकमेच्या दोन जामिनावर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shah rukh khan and gauri khan set new routine for son aryan khan after released from jail nrp

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या