बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या कुटुंबाची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा सुरु आहे. शनिवारी २ ऑक्टोबरला रात्री मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर एनसीबीने छापेमारी करत बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेतलं. रविवारी आर्यनला अटक करण्यात आली. त्यानंतर आर्यनसह इतर सात जणांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या घटनेनंतर आर्यनसह संपूर्ण खान कुटुंबाची बी-टाऊनमध्ये चर्चा पाहायला मिळत आहे. नुकतंच शाहरुखने आपल्या मोठ्या मुलाचे नाव आर्यन का ठेवले? याची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आर्यनला अटक झाल्यानंतर शाहरुख खानच्या अनेक जुन्या मुलाखती सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात शाहरुखने त्याच्या कुटुंबाबद्दलच्या काही गोष्टी शेअर केल्या आहेत. दरम्यान नुकतंच शाहरुखने आपल्या मोठ्या मुलाचे नाव आर्यन का ठेवले? ही जुनी मुलाखत सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
शाहरुखची ही मुलाखत त्याच्या कारर्किदीच्या सुरुवातीच्या काळातील आहे. शाहरुखने आर्यनच्या जन्मानंतर सिमी ग्रेवालच्या शोमध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी शाहरुखला आर्यनच्या नावाबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी त्याने याबाबत खुलासा केला आहे. “मला आणि गौरीला आर्यन हे नाव प्रचंड आवडते. आम्ही दोघेही त्या नावाच्या प्रेमात होतो,” असे शाहरुख खान आर्यनबद्दल म्हणाला.
“आर्यनचे नाव ऐकताच अनेक मुली त्याच्यावर इम्प्रेस व्हाव्यात, असे मला वाटते. जेव्हा माझा मुलगा एखाद्या मुलीला म्हणेल की, ‘हॅलो माय नेम इज आर्यन खान’, तेव्हा ती मुलगी आपोआपच इम्प्रेस होईल.” असे शाहरुखने सांगितले.
“आर्यनचा चेहरा हा आमच्या दोघांशी मिळता-जुळता आहे. त्याच्यात गौरी आणि माझे दोघांचे समान गुण आहे. आमच्या दोघांचे डोळे आणि ओठ मोठे आहेत. मला माहित नाही, त्याच्यात माझ्यासारख्या भावना आहेत की नाही, पण तो आमच्या दोघांसारखाच आहे. पण हे देखील तितकेच खरंय की मी त्याचा डायपर कधीही बदलला नाही,” असे शाहरुखने या मुलाखतीदरम्यान सांगितले. शाहरुख आणि गौरीला आर्यन, सुहाना आणि अबराम अशी तीन मुलं आहेत. यापैकी आर्यन वयाने सर्वात मोठा असून अबराम आठ वर्षांचा आहे.