scorecardresearch

“यावर तुझं नियंत्रण नाही…” लेक सुहानासाठी शाहरुखनं लिहिलेली पोस्ट चर्चेत

शाहरुख खानची लेक सुहाना खान ‘द आर्चीज’ चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करत आहे.

shah rukh khan, gauri khan, shah rukh khan instagram, suhana khan, agastya nanda, zoya akhtar, the archies, the archies teaser, the archies first look, khushi kapoor, खुशी कपूर, सुहाना खान, अगस्त्य नंदा, द आर्चीज, द आर्चीज फर्स्ट लुक, झोया अख्तर, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, गौरी खान
अभिनेता शाहरुख खाननं त्याच्या लेकीसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

बॉलिवूड किंग शाहरुख खानची मुलगी सुहाना खान लवकरच दिग्दर्शक झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच समोर आला आहे. झोया अख्तरचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात लोकप्रिय कॉमिक बुक ‘द आर्चीज’चं देसी व्हर्जन पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता शाहरुख खाननं त्याच्या लेकीसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

सुहाना खानसाठी आजचा दिवस खास आहे. या दिवशी शाहरुखनं तिच्यासाठी खास नोट शेअर केली आहे. त्यानं लिहिलं, “सुहाना लक्षात ठेव. तू कधीच परफेक्ट असणार नाहीस. पण तू फक्त तू आहेस. नेहमीच दयाळू राहा आणि एक कलाकार म्हणून तुला जे शक्य असेल ते सर्व दे… तुझ्यावर टीका केली जाईल, तुझं कौतुक होईल पण यावर तुझं नियंत्रण असणार नाही. तुमचा जो अर्धा भाग पडद्यावर सुटतो तो नेहमीच तुमचा असतो… तुला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. लोकांच्या हृदयापर्यंत जाणाऱ्या रस्त्याला अंत नाही. त्यामुळे पुढे जात राहा. जेवढं शक्य असेल हसत राहा. आता लाइट कॅमेरा अॅक्शन होऊन जाऊ दे. एका दुसऱ्या कलाकाराकडून”

आणखी वाचा- “पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे मी एकटी पडले होते अन्…” मुमताज यांचा धक्कादायक खुलासा

याशिवाय सुहाना खानची आई गौरी खाननं देखील तिच्या मुलीसाठी एक प्रेमळ पोस्ट लिहिली होती. आपल्या इन्स्टाग्रामवर सुहानाच्या चित्रपटाचं पोस्टर शेअर करताना तिने लिहिलं, “सुहाना अखेर तू करून दाखवलंस” आपल्या या पोस्टमध्ये गौरीनं सर्व स्टारकास्टला शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच तिनं या पोस्टमध्ये झोया अख्तरचं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा- “मला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही…” रणवीर सिंगचं टीकाकारांना सडेतोड उत्तर

प्रसिद्ध दिग्दर्शक झोया अख्तरच्या या चित्रपटात सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा या स्टार किड्ससोबतच अभिनेत्री डॉट, मिहिर आहूजा, वेदांग रैना, युवराज मेंडा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट कॉमिक बुकमधील पात्र आर्ची एंड्रयूज आणि त्याचे मित्र यावर आधारित आहे. या चित्रपटात झोया अख्तरनं कॉमिक बुकमधील पात्रांना भारतीय लुक देण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shah rukh khan wrote emotional post for daughter suhana khan after the archies first look release mrj

ताज्या बातम्या