बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना खान ही सतत चर्चेत असते. ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सुहाना ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती सतत काहीना काही पोस्ट शेअर करताना दिसते. सध्या सोशल मीडियावर सुहाना खानची एक पोस्ट चर्चेत आहे.

सुहाना न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेत होती. आता तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत न्यूयॉर्क सोडत असल्याचे म्हटले आहे. सुहानाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर न्यूयॉर्कमधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर ‘काळजी करु नका. जरी तुम्ही न्यूयॉर्क सोडून जात असला तरी तुम्ही कायम न्यूयॉर्कचे नागरिक राहाल’ असे लिहिण्यात आले आहे. हा फोटो शेअर करत तिने एक इमोजी वापरला आहे.
फोटो : किंग खानची मुलगी राहत असलेले न्यूयॉर्कमधील आलिशान घर पाहिलेत का?

सध्या सोशल मीडियावर सुहानाच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. तिच्या एका मैत्रीणीने ‘यापुढे तू खूप चांगल्या गोष्टी करणार आहेस’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका मैत्रीणीने ‘तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा’ असे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकीकडे सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यासाठी ती न्यूयॉर्क सोडून भारतात परत आली असल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे सुहानाचा भाऊ आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यामुळे तिने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. सुहाना झोया अख्तरच्या ‘अर्चिस’ या सीरिजमधून पदार्पण करणार आहे. सुहाना सोबत खुशी कपूर, अगस्त नंदा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.