scorecardresearch

‘नेक्स्ट मिशन बॉयकॉट पठाण’, आमिर खान, अक्षय कुमारपाठोपाठ शाहरुख खान ट्रोलर्सच्या निशाण्यावर

‘रक्षाबंधन’ आणि ‘लाल सिंग चड्ढा’प्रमाणे किंग खानच्या ‘पठाण’ला देखील प्रेक्षकांचा विरोध

‘नेक्स्ट मिशन बॉयकॉट पठाण’, आमिर खान, अक्षय कुमारपाठोपाठ शाहरुख खान ट्रोलर्सच्या निशाण्यावर
'रक्षाबंधन' आणि 'लाल सिंग चड्ढा'प्रमाणे किंग खानच्या 'पठाण'ला देखील प्रेक्षकांचा विरोध

सध्या बॉलिवूडमध्ये नवनवे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. पण प्रेक्षक मात्र या चित्रपटांकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. त्यातच आता चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची नवीन पद्धत ट्रेंड होताना दिसत आहे. नुकताच प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’, आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटांना प्रदर्शनाआधीच विरोध दर्शवण्यात आला. या चित्रपटांच्या विरोधातील ‘बॉयकॉट ट्रेंड’ चर्चेचा विषय ठरला. आता यात आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे.

शाहरुख खानचा ‘पठाण’ हा आगामी चित्रपट आता प्रेक्षकांच्या निशाण्यावर आहे. ‘बॉयकॉट पठाण’ (#BoycottPathan) ट्विटरवर ट्रेंड होत आहे. त्यामुळे ‘रक्षाबंधन’ आणि ‘लाल सिंग चड्ढा’प्रमाणे ‘पठाण’ला देखील प्रेक्षकांचा विरोध होणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. मोठ्या कालावधीनंतर शाहरुख ‘पठाण’ चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. पण बॉयकॉट ट्रेंडमुळे प्रदर्शनाआधीच त्याचा हा चित्रपट संकटात सापडला आहे.

आणखी वाचा – आमिर खानच्या लाल सिंग चड्ढामध्ये शाहरुख खानची एण्ट्री, या भूमिकेत झळकणार

‘पठाण’ चित्रपटाला विरोध करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ट्विटरवर एका यूजरने लिहिले आहे, ‘नेक्स्ट मिशन बॉयकॉट पठाण’. तर एकाने लिहिले आहे, ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’च्या यशानंतर लवकरच येत आहे ‘बॉयकॉट पठाण’.

आणखी वाचा – Video : सेल्फी घेणाऱ्या चाहत्यावर भडकला शाहरुख खान, आर्यनच्या ‘त्या’ कृतीचं होतंय कौतुक

‘पठाण’ हा चित्रपट पुढच्या वर्षी २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख सध्या ‘डंकी’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. तापसी पन्नू देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख खान आणि तापसी पन्नू ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. राजकुमार हिरानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. याशिवाय शाहरुख खान ‘जवान’ या चित्रपटामध्येही दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shah rukh khans movie in trouble boycott pathan new trend on twitter pns

ताज्या बातम्या