बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याला पुन्हा एकदा पालिकेचा दणका पडला आहे. गोरेगाव येथील त्याच्या ‘रेड चिलिज वीएफएक्स’ कार्यालयावर पालिकेने हातोडा मारला आहे. महापालिकेच्या पी दक्षिण विभागाने ही धडक कारवाई केली. डीएलएच पार्क या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली आहे.

वाचा : रुपेरी पडद्यावर पुन्हा झिंगाट एण्ट्री करण्यासाठी रिंकू सज्ज!

डीएलएच इनक्लेव्ह इमारतीच्या चौथ्या मजल्यावर शाहरुखच्या रेड चिलिजचे कार्यालय आहे. इमारतीच्या गच्चीचे रुपांतरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी उपहारगृह म्हणून करण्यात आले होते. हे बांधकाम अनधिकृत असल्याने अखेर पालिकेने आपला इंगा दाखविला.

रेड चिलिजच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ती मालमत्ता रेड चिलिजच्या मालकीची नसून आम्ही ती भाडेतत्वावर घेतली आहे. कार्यालयाबाहेर असलेल्या खुल्या जागेत कर्मचारी जेवायला बसायचे. आम्ही तेथे उपहारगृह उभारले नव्हते. गैरसमजुतीमुळे पालिकने इमारतीचा भाग उध्वस्त केला आहे. या भागात ऊर्जा बचतीसाठी वापरले जाणारे सोलार पॅनल होते. वीएफएक्सच्या संपूर्ण कार्यालयासाठी त्याचा वापर होत होता. याप्रकरणी रेड चिलीज व्हीएफएक्सने संबंधित अधिका-यांशी पालिकेकडे संपर्क साधला आहे.

वाचा : VIDEO ‘राणा दा’ने असा साजरा केला वाढदिवस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशाप्रकारच्या परिस्थितीला शाहरुखने सामोरं जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी २०१५ साली, वांद्रे येथील त्याच्या ‘मन्नत’ बंगल्याबाहेर असलेला रॅम्प मुंबई पालिका आणि पोलिसांनी तोडला होता. हेसुद्धा अनधिकृत बांधकाम होते.