‘कुछ रंग प्यार के’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला टीव्ही अभिनेता शाहीर शेख लवकच पिता बनणार आहे. त्यामूळे सध्या तो खूपच खूश आहे. त्याची पत्नी रूचिका कपूर प्रेग्नंट आहे. रूचिका कपूर सध्या तीन महिन्यांची गर्भवती आहे. त्यामूळे दोघांच्या आयुष्यात नवा टप्पा सुरू होत असल्याने दोघेही उत्साहित झाले आहेत. अभिनेता शाहीर आणि रूचिकाने दिलेली ही गोड बातमी ऐकून त्याचे चाहते देखील खूश झाले आहेत. पण तरीही गोड बातमीबाबत त्याला कुणाला सांगायची इच्छा नाही.

टीव्ही अभिनेता शाहीर शेख हा आतापर्यंत त्याच्या पर्सनल लाइफ बद्दल बोलताना कधीच दिसला नाही आणि त्याला ते आवडत देखील नाही. त्याच्या घरी लवकरच एका लहान पाहूण्याची एन्ट्री होणार आहे. ही गोड बातमी त्याला कुणालाच सांगायची इच्छा नाही, असं शाहीर शेखने एका माध्यमाशी बोलताना स्पष्ट केलंय. यामागचं कारण ही तसंच आहे. सध्या करोना महामारीमुळे देशात जी संकटं सुरू आहेत, अशा परिस्थितीत त्याला ही गोड बातमी देणं योग्य वाटत नाही, असं शाहीर शेख म्हणाला. तसंच रूचिका सध्या तीन महिन्यांची गर्भवती असून त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या नव्या टप्प्यासाठीचे एक एक क्षण ते अनुभवत आहेत, असं ही शाहीर शेख म्हणाला.

शाहीर शेख आणि रूचिका कपूर यांचं लग्न गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालं होतं. या दोघांची भेट ‘जजमेंटल है क्या’ चित्रपटाच्या मेकिंग दरम्यान एका कॉमन फ्रेंडमुळे झाली होती. पहिल्याच भेटीत दोघांनी एकमेकांना पसंत केलं. सुरवातील या दोघांची मैत्री झाली आणि काही दिवसांनतर कोर्ट मॅरेज करून ते दोघेही विवाहबंधनात अडकले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shaheer Sheikh (@shaheernsheikh)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रूचिका बद्दल सांगताना एकदा शाहीर शेखने सांगितलं होतं, “रूचिका खूप प्रामाणिक आहे…आम्ही दोघेही एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रिणी आहोत, ही आमच्या नात्यातली एक मजबूत बाजू आहे. एक अभिनेता या नात्याने मला कॅमेरासमोर रोज नव नव्या भूमिका निभवाव्या लागतात…पण मला आता तिच्या रूपातून एक पार्टनर भेटलीय जिच्या समोर मी रिअल राहू शकतो. मी खूप नशीबवान आहे, की मला रूचिकासारखी पार्टनर भेटली आहे…मी कायम तिच्यासोबत राहण्यासाठी तयार आहे.”

रूचिका कपूर बद्दल सांगायचं झालं तर ती एकता कपूर फिम्सची हेड आहे. खूप काळ एकमेकांना डेट केल्यानंतर शाहीरने त्याच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत त्यांच्यातील नात्याबाबत जाहीर केलं होतं. जवळजवळ दीड वर्ष ते दोघे एकमेकांना डेट करत होते.

काही दिवसांपूर्वीच अभिनेता शाहीर शेख हा अभिनेत्री हिना खानसोबत श्रीनगरमध्ये गेला होता. ते दोघे एकत्र एका प्रोजेक्टमध्ये काम करत आहेत. पण वडिलांच्या निधनाची बातमी कळताच हिना खान तिथून परतली.