बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर व मीरा राजपूत मीशा आणि जैन या दोन गोंडस मुलांचे पालक झाले आहेत. परिणामी त्यांना आता आणखीन मोठ्या घराची गरज भासू लागली आहे. कुटुंब वाढल्यामुळे गेले अनेक महिने शाहिद चार लोकांना राहता येईल अशा एखाद्या मोठ्या घराच्या शोधात होता. अखेर शाहिद कुटुंबाच्या या स्वप्नातल्या घराचा शोध पूर्ण झाला आहे.
शाहिद कपूरने मुंबईतील वरळी भागात सी फेसींग फ्लॅट विकत घेतला आहे. तब्बल ५६ कोटी रुपये मोजून त्याने हा फ्लॅट विकत घेतला आहे. त्याचे हे दूमजली नवीन घर आठ हजार चौरस फुटांचे आहे. गमतीशीर बाब म्हणजे शाहिद कपूरने ज्या ईमारतीत वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला त्याच ईमारतीत बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडपे रणविर सिंह आणि दीपिका पादुकोण हे देखील वास्तव्य करत आहेत. शाहिद कपूरने त्यांच्या शेजारचाच फ्लॅट खरेदी केला आहे.
शाहिद कपूरचे हे नवे घर आठ हजार चौरस फुटांचे आहे. या घरात ५०० चौरस फुटांची बालकनी आहे. या बालकनीतुन बांद्रा-वर्ली सी-लिंक पाहता येतो. शिवाय अद्यायावत सेवांनी भरलेल्या या घरात स्पा, जिम, बॉलरूम, स्वीमिंग पूल यांसारख्या सुवीधा देखील आहेत. तसेच शाहिदने ज्या ठिकणी हे नवे घर घेतले त्याच्या आसपास क्रिकेटर विराट कोहली व युवराज सिंह यांची देखील घरे आहेत.