बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खान. शाहरुख खाने आजवर एका पेक्षा एक चित्रपटात काम करुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहेत. मात्र २०१८ नंतर त्याने कोणत्याही चित्रपटात काम केले नाही. त्यामुळे चाहते पुन्हा एकदा त्याला मोठ्या पडद्यावर पाहाण्यासाठी खुप आतुर झाले आहेत. अशात शाहरूखचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनिवारी शाहरुखला एका बिल्डिंगमधून बाहेर पडताना स्पॉट करण्यात आले. बाहेर मीडिया त्याच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करत होती. तरीही अभिनेता त्याचा चेहरा लपवताना दिसत होता. त्याने काळ्या रंगाचा हूडी परिधान करुन थेट त्याच्या गाडीत जात असल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळाले. तसंच त्याचा मुलगा आर्यनला देखील एका रेस्टॉरंटमध्ये जाताना स्पॉट करण्यात आले होते. सध्या शाहरुखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी कमेंट सेक्शनमध्ये शाहरुखला ट्रोल करत आहेत.

‘बॉलिवूड पॅपने ‘ शेअर केलेल्या या व्हिडीओ खाली एका युजरने लिहिले, “इतका भाव खाणाऱ्या अभिनेत्याला मीडिया का महत्व देते?” . दुसऱ्या युजरने लिहिले, “माज किती आहे बघा”. तिसऱ्या युजरने लिहिले,”या लोकांपेक्षा साऊथचे अॅक्टर बरे आहेत, ते रिस्पेक्ट तरी देतात.” तर चौथ्या युजरने शाहरुख चेहरा का लपवत आहे?”,असा प्रश्न विचारला आहे.

काही दिवसांपूर्वी शाहरुख पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत पोझ देताना दिसला होता. त्यामुळे ते फोटो त्याच्या नवीन चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेचे आहेत अशा चर्चा रंगत होत्या. ‘झिरो’ या चित्रपटानंतर शाहरुखला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक आता आतुर झाले आहेत. दरम्यान शाहरुख सिद्धार्थ निगम दिग्दर्शित ‘पठाण’ या चित्रपटवर काम करत आहे. अद्याप निर्मात्यांकडून या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी २०२२ सालामध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशा चर्चा आहे. या चित्रपटात  शाहरुखसोबत दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan covered his face with his hoodie while media approach him aad
First published on: 26-09-2021 at 12:01 IST