बॉलिवूडचा किंग खान म्हणून अभिनेता शाहरुख खानला ओळखले जाते. शाहरुख खानचे जगभरात लाखो चाहते आहेत. शाहरुखची स्टाईल, त्याचे कपडे, त्याची हेअरस्टाईल याची सर्वत्र चर्चा सुरु असते. शाहरुख खानच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पठाण’ चित्रपटाचा टीझर नुकतंच प्रदर्शित झाला. यात शाहरुख खानच्या स्टाईलचे सर्वजण कौतुक करत आहे. यात शाहरुखने पूर्वीप्रमाणे त्याचे केस वाढवल्याचे दिसत आहे. नुकतंच एका चाहत्याने त्याच्या वाढलेल्या केसांवरुन प्रश्न विचारला आहे.

शाहरुखने ट्विटरवर AskSRK द्वारे चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी त्याच्या चाहत्यांनी त्याला पठाण चित्रपटातील त्याच्या लूकबद्दल प्रश्न विचारला. सध्या या प्रश्नाची आणि शाहरुखच्या उत्तराची सर्वत्र चर्चा सुरु आहे. यावेळी प्रश्न विचारताना तो चाहता म्हणाला, सर तुम्हाला पठाण चित्रपटासाठी केस वाढवायला किती वेळ लागला? मी अशी आशा करतो की यासाठी तुम्ही हेअर एक्सटेंशन (hair extensions) वापरले नसेल. यामागचे नेमकं रहस्य काय?

यावर शाहरुखने फार मजेशीररित्या उत्तर दिले. त्यावर शाहरुख म्हणाला, “भावा, जेव्हा माझ्यासारखे केस असतात तेव्हा याला जास्त वेळ लागत नाही. घरातील शेती आहे ना…”, असे म्हणत शाहरुखने पठाण असा टॅगही दिला आहे. दरम्यान शाहरुखचे हे उत्तर ऐकून तो चाहताही फार हसू लागला.

आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ पाहिलास का? शाहरुख खान म्हणाला, “मला आधी पठाण…”

यश राज फिल्मला लवकरच ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्ताने यश राज फिल्म्स ‘पठाण’ हा चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटात शाहरुख खान हा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. पठाण या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमही दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख आणि जॉन ही जोडी पहिल्यांदा पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुख खानचा पठाण चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषेत प्रदर्शित होणार आहे. येत्या २५ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.