वडील -मुलाचे नाते हे नेहमीच तणावपूर्ण आणि संवेदनशील राहिले आहे. मुलाची आईसोबत जितकी जवळीक, मैत्रीपूर्ण नाते असते, तितकीच भीती, दरारा वडिलांबाबत असतो. एकमेकांमध्ये सुसंवाद नसतो. अनेकदा एकमेकांविषयी प्रेम असूनही ते व्यक्त करण्यासाठी दोघेही संकोच करतात. अशाने त्यांच्या नात्यातील दरी अधिकच खोल होत जाते. अशा या गुंतागुंतीच्या नात्यावर भाष्य करणारी ‘बाप बीप बाप’ वेबसीरिज ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’द्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून वडील – मुलाचे अवघड नाते यात दिसत आहे. लॉकडाउन आधी कधीच एकत्र वेळ न घालवलेल्या वडील-मुलाला जेव्हा लॉकडाउनमुळे नाईलाजास्तव एकमेकांबरोबर वेळ घालवावा लागतो तेव्हा नक्की काय होते? या काळात नात्यातील संवाद गवसतो का? त्यांच्या नात्याचा हा गुंता सुटतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वरील ‘बाप बीप बाप’ मध्ये मिळणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमित कान्हेरे दिग्दर्शित या वेबसीरिजमध्ये शरद पोंक्षे, शिल्पा तुळसकर, पर्ण पेठे, तेजस बर्वे, उदय नेने हे मुख्य भूमिकेत आहेत. अमित कान्हेरे यांनी हा विषय अतिशय छान पद्धतीने हाताळला आहे. थोडेसे अबोल, संकोच असलेले हे नाते उगीचच गंभीर न करता अतिशय गोड आणि हलक्या फुलक्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडले आहे. या वेबसीरिजचे लेखन प्रतिक उमेश व्यास आणि अमित कान्हेरे यांनी केले असून संवाद योगेश जोशींनी लिहिले आहेत तर छायाचित्रणाची धुरा विशाल सांघवाई यांनी सांभाळली आ