बॉलीवूडची अभिनेत्री माधुरी दीक्षितने तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या नृत्य आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावले आहे. असा एक अभिनेता आहे, ज्याने माधुरीचे सौंदर्य पाहूनच चित्रपट साइन केला होता.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या अभिनेत्याने त्या चित्रपटासाठी एकही रुपया मानधन न घेता चित्रपट केला. त्याने चक्क तिच्यासाठी सिनेमात फुकट काम केलं होतं. चला तर मग जाणून घेऊया तो अभिनेता कोण आहे?

माधुरी दीक्षितने ४० वर्षांपूर्वी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. चार दशकांपूर्वी तिने १९८४ मध्ये आलेल्या ‘अबोध’ चित्रपटातून पदार्पण केले होते. तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला तिने अभिनेता शेखर सुमनबरोबर काम केले होते. दोघेही ‘मानव हत्या’ (१९८६) चित्रपटात दिसले होते. पण, सुरुवातीला तो या चित्रपटात काम करण्यास तयार नव्हता.

काही वर्षांपूर्वी, दैनिक भास्करशी झालेल्या संभाषणात शेखर सुमन यांनी सांगितले होते की, ‘मानव हत्या’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुदर्शन के रतन यांनी त्यांना फोन केला होता. त्यांनी चित्रपट ऑफर केला होता, पण त्यांनी सांगितले की ते पैसे देऊ शकणार नाहीत. अभिनेत्याच्या मते, दिग्दर्शक त्यांना पैसे देत नव्हते आणि त्याशिवाय नायिका (माधुरी दीक्षित) देखील त्यावेळी नवीन होती.

सुदर्शनने शेखरला सांगितले होते की, ती अभिनेत्री नवीन आहे आणि तिने राजश्रीबरोबर ‘अबोध’मध्ये काम केले आहे. शेखर म्हणाला, “ते पैसे देणार नाहीत, नायिकाही नवीन आहे, मग मी ते कसे करू.” पण, यानंतर जेव्हा त्याने माधुरीला पाहिले तेव्हा त्याने आपला विचार बदलला. मग सुदर्शनने विचारले, “तू काम करशील का?” यावर अभिनेता म्हणाला, “ती खूपच सुंदर आहे, मी आवडीने काम करेन.”

चित्रपटाच्या वेळी माधुरी आणि शेखर दोघेही बॉलीवूडमध्ये नवीन होते. शेखरने सांगितले होते की, ‘मानव हत्या’च्या चित्रीकरणादरम्यान तो आणि माधुरी एकाच बाईकवरून प्रवास करायचे. शेखरने सांगितले होते की तो आणि माधुरी त्यावेळी मुंबईतील एकाच परिसरात राहत होते. अभिनेता माधुरीला घेण्यासाठी तिच्या घरी त्याच्या बाईकवरून जायचा आणि शूटिंगनंतर अभिनेत्रीला घरी सोडायचा.

‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितच्या सौंदर्याची स्तुती करावी तितकी कमीच आहे. तसंच तिची गोड स्माईल भल्याभल्यांना घायाळ करते. अनिल कपूर, संजय दत्त, सलमान खान यांच्याबरोबर माधुरीची जोडी खूप गाजली. तसंच तिच्या नृत्य कौशल्याचे आजही लोक चाहते आहेत.