आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. विद्या बालनचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट ‘शेरनी’चा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहता प्रेक्षकांनी याला पसंती दिल्याचे दिसतं आहे. एवढंच नाही तर काही महिला वन अधिकाऱ्यांनी देखील विद्याच्या अभिनयाची स्तुती केली आहे.

आणखी वाचा : ‘साराभाई’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री तरला जोशी यांचे निधन

या चित्रपटात विद्या एका वन अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. विद्याची ही भूमिका पाहता काही महिला वन अधिकाऱ्यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक अधिकारी म्हणाल्या, “हा चित्रपट एका वन अधिकाऱ्याच्या आयुष्यावर आधारीत आहे. ट्रेलर नक्कीच पाहा, ” दुसऱ्या अधिकारी म्हणाल्या, “माणूष्य आणि वन्य प्राण्यामध्ये असलेली लढाई ही प्रत्येकाच्या जगण्याचा संघर्ष दाखवत आहे. ही कहाणी एका वन अधिकाऱ्याची आहे जो या सगळ्यात संतुलन आणण्याचा प्रयत्न करतो,” अशा अनेक अधिकाऱ्यांनी ट्वीट करत विद्याच्या अभिनयाची आमि चित्रपटाची स्तुती केली आहे.

पुरूषप्रधान पद्धतीत कशा प्रकारे सामाजिक अडथळे निर्माण होतात ते या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटात शरद सक्सेना, मुकुल चड्ढा, विजय राझ, इला अरूण, ब्रिजेंद्र काला आणि नीरज काबी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

आणखी वाचा  : ‘राधे माँ’, यामी गौतमचा लग्नातील ड्रेस पाहून कलाकारांनी उडवली खिल्ली

टी-सिरीज आणि अबंडनतिया एंटरटेनमेंटने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘शेरनी’चे दिग्दर्शन अमिक मसुरकर यांनी केले आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १८ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.