बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. यंदाचा बिग बॉस १५ वे पर्व सुरु आहे. शमिता ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. शमिताला फक्त तिचे चाहते नाही तर बहिण आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही पाठिंबा देताना दिसते. तर काही लोक म्हणतात की शमिताला खूप सुख-सुविधा मिळाल्या आहेत.

शोमध्ये कधी शमिता चुकीची आहे असे म्हटले जाते तर कधी ती दुसऱ्यांवर हक्क गाजवणारी आहे, असे म्हटले जाते. तिच्या विषयी या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर ती बऱ्याचवेळा स्पष्टीकरण देताना दिसते. आता शिल्पाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून विकेंड का वार मधील एक क्लिप तिने शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत शिल्पा म्हणाली, “हे माझ्या बहिणीसाठी, काही लोक शमिताच्या वागण्याचा अहंकारी म्हणून कसा चुकीचा अर्थ लावत आहेत हे पाहून वाईट वाटते कारण त्यांना वाटते तिला सगळ्या सुख-सुविधा मिळाल्या आहेत, तिचे काही मत नसते किंवा ती निर्यण हे हृदयाने घेते डोक्याने नाही. पण हे पूर्णपणे खोटं आहे. मी हे फक्त ती माझी बहिण आहे म्हणून बोलत नाही तर बिग बॉसची एक प्रेक्षक म्हणून बोलते.”

आणखी वाचा : आपण एवढे श्रीमंत का आहोत? अक्षयच्या मुलाने विचारला होता प्रश्न, ट्विंकल म्हणाली…

पुढे शिल्पा म्हणाली, “मी या शोवर कधीही कमेंट केलेली नाही, परंतु बरेच लोक कमेंट करत असताना चांगले किंवा वाईट जे पाहिजे ते बोलतात, बिग बॉसची माजी सुत्रसंचालक आणि स्पर्धक म्हणून मला असे वाटते शमितावर भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेणे आणि तिला शोमध्ये लोकांना माफ करत असल्याचे आरोप केले जात आहेत. सुख-सुविधा असल्याचे म्हणत आरोप केले. असं असतं तर तिने शोमध्ये स्वत:ची जागा निर्माण करण्याचा प्रयत्न केला नसता. मी एका गोष्टीची खात्री देऊ शकते की तुम्ही तिच्याबद्दल जे पाहता ते खरं आहे. हाच तिचा USP आहे. तिला या खेळाबद्दल वगैरे कळतं नाही. आम्ही श्रीमंत म्हणून जन्माला आलो नाही, आम्ही दोघांनी संघर्ष केले आहेत, आमच्या मध्यमवर्गीय मूल्यांचे पालन केले, यालाच पालनपोषण बोलतात.”

आणखी वाचा : शाल्मलीने बॉयफ्रेंड फरहान शेखसोबत बांधली लग्नगाठ!

पुढे शिल्पा म्हणाली, “ती हा शो जिंकले किंवा नाही, ती नंतरची गोष्ट आहे. पण आयुष्यात कोणताही शो किंवा खेळात एखाद्या व्यक्ती त्याची प्रतिष्ठा गमावता कामा नये. ती या शोमध्ये राहण्यासाठी खूप मेहनत घेत आहे त्यावेळी मला बहीण म्हणून फार अभिमान वाटतो. शो एकदिवस संपेल पण आठवणी कायम राहतील…आणि, शमिता वाघिणीच्या रुपात लक्षात राहील आणि शमिता एक वाघिणीच्या रुपात सगळ्यांच्या लक्षात राहिल आणि तिच्यात असलेला प्रामाणिकपणाने नक्कीच सगळ्यांची मने जिंकली असतील. ती शोमध्ये असल्यामुळे मला तिची खूप आठवण येते, मित्रांनो, आमच्या Queen of Heartsला पाठिंबा द्या.”