बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘स्पायडर मॅन नो वे होम’ हा चित्रपट आज अखेर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटासाठी अनेकजण अॅडव्हान्स बुकींग करताना दिसत आहे. त्यामुळे अनेकांना चित्रपटगृहात तिकीट मिळण्यात फार अडचणी येत आहे. त्यामुळे अनेक चाहते निराश झाले आहेत. फक्त सर्वसामान्य नव्हे तर बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी देखील या चित्रपटाचे तिकीट मिळवण्याचे प्रयत्न करत आहे.
नुकतंच शिल्पा शेट्टीने तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती स्वत: स्पायडर मॅनकडे तिकीट मागताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहे.
या व्हिडीओत “शिल्पा शेट्टी ही ‘स्पायडर-मॅन: नो वे होम’ या चित्रपटाचे तिकीट बूक करताना दिसत आहे. हे तिकीट बूक करत असताना ती घरात येते. त्यावेळी तिच्या घरी स्पायडर मॅन असल्याचे पाहून ती चकित होते. त्यावेळी ती त्याला बसायला सांगते. तेव्हा स्पायडर मॅन त्याच्या स्टाईलने बसलेला असताना ती देखील तशीच बसते. यावेळी ती स्पायरन मॅनकडे तिकीट मागते. “एक तिकीट दे दो बाबा,” असे ती यावेळी म्हणते. पण स्पायडर मॅन तिला स्पष्टपणे नकार देतो. त्यावेळी शिल्पा म्हणते, “आपण एक काम करु, मी तुला काहीतरी शिकवते त्यानंतर तू मला तिकीट दे. यावेळी शिल्पा शेट्टी म्हणते मी तुला नाचायला शिकवते. यानंतर ती एक स्टेप करते, मात्र त्याला ती डान्स स्टेप करायला जमत नाही. यानंतर ती म्हणजे ही स्टेप जाऊ दे. आपण दुसरी स्टेप शिकू.”
“यानंतर ती त्याला ‘चुरा के दिल मेरा’ या गाण्यावर डान्स शिकवण्याचा प्रयत्न करते. तो देखील ती डान्स स्टेप शिकतो. यानंतर ती त्याला विचारते आता माझी तिकीट दे. यावर तो नकारार्थी मान डोलावतो.” दरम्यान शिल्पा शेट्टी आणि स्पायडर मॅनचा हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओला कॅप्शन देताना शिल्पा म्हणाली. महान सामर्थ्य असेल तर मोठी जबाबदारी येते. स्पायडर! आणि मला तिकिटे मिळवून देणे ही तुमची जबाबदारी आहे. कारण मला ती सापडत नाहीत, असे तिने म्हटले आहे. शिल्पा शेट्टीचा हा व्हिडीओ ५ लाखांहून अधिकांनी पाहिला आहे. यात काही नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे. तर काहींनी तिला ट्रोल केले आहे. शिल्पा ओव्हर अॅक्टिंग करतेय, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे.
‘स्पायडर-मॅन: नो वे होम’ हा चित्रपट आज भारतातील चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. इंग्रजीशिवाय तो हिंदी, तमिळ, तेलगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर उद्या म्हणजेच १७ डिसेंबरला हा चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित होणार आहे.