shilpa shetty revealed her fan written love letter from blood : ९० च्या दशकातील क्वीन शिल्पा शेट्टी ही बॉलीवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. आजही ती मोठ्या पडद्यावर आपले आकर्षण दाखवण्यात मागे नाही.
शिल्पा शेट्टी आता चित्रपटांमध्ये कमी दिसली असली तरी चाहत्यांमध्ये तिच्याबद्दलची क्रेझ कमी झालेली नाही. अभिनेत्री आता तिच्या फिटनेस आणि स्टाईलने सोशल मीडियावर चाहत्यांची मने जिंकत आहे.
शिल्पा शेट्टीने केवळ बॉलीवूडमध्येच नाही, तर भारतीय फॅशन जगतातही स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्रीचा फॅशन सेन्स नेहमीच असा राहिला आहे की, तो सर्वांना प्रेरणा देतो. गेल्या अनेक वर्षांच्या तिच्या कारकिर्दीत तिने एकामागून एक लूक स्वीकारून चाहत्यांची मने जिंकली आहेत.
अलीकडेच शिल्पा शेट्टीने एका खास संभाषणादरम्यान तिचे मन मोकळे केले आणि तिला कोणत्या प्रकारच्या प्रेमाची आठवण येते हे सांगितले. त्याबरोबरच अभिनेत्रीने असेही सांगितले की, एकदा कोणीतरी तिच्यासाठी रक्ताने पत्र लिहिले होते. शिल्पा शेट्टीचा तो चाहता कोण होता, ज्याने तिच्यासाठी रक्ताने प्रेमपत्र लिहिले होते, चला तर मग जाणून घेऊयात.
शिल्पा शेट्टीला कोणाच्या प्रेमाची आठवण येत आहे?
काजोल-राणी मुखर्जी, प्रीती झिंटा यांच्याप्रमाणेच शिल्पा शेट्टीही ९० च्या दशकात खूप लोकप्रिय होती. तिच्यावर प्रेम करणाऱ्यांची कमतरता नव्हती. ‘जागरण’शी बोलताना, शिल्पा शेट्टीने त्या जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, तिला आजकाल कोणाच्या प्रेमाची सर्वांत जास्त आठवण येत आहे.
तिच्या संस्मरणीय क्षणांबद्दल बोलताना शिल्पा म्हणाली, “सर्वांत जास्त म्हणजे ९० च्या दशकात प्रेक्षक त्यांच्या स्टार्सना जे प्रेम देत असत, ते मला आठवतं. त्यावेळी आम्हाला चाहत्यांकडून पत्रं येत असत. माझा एक चाहता होता, जो त्याच्या रक्तानं पत्रेंलिहायचा. मी त्याला माझा फोटो पाठवला आणि एक पत्र लिहिले की, जर तू माझा खरा चाहता असशील, तर भविष्यात रक्तानं पत्रं लिहू नकोस. ते भयानक होतं”.
शिल्पा पुढे म्हणते, “या इंडस्ट्रीमध्ये अनेक मिथकं आहेत, जी लोकांना माहीत असायला हवीत. अनेक लोकांना वाटतं की, ही इंडस्ट्री खूप ग्लॅमरस आहे आणि आम्ही कलाकार फारशी मेहनत करीत नाही. हे एक मोठं मिथक आहे.” शिल्पा शेट्टीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, ती सध्या चित्रपटांपासून दूर आहे आणि टीव्ही रिअॅलिटी शो ‘सुपर डान्सर सीझन 5’चे परीक्षण करत आहे.
शिल्पा शेट्टीच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात १९९३ मध्ये ‘बाजीगर’ या चित्रपटाने झाली, ज्यामध्ये तिने काजोलच्या धाकट्या बहिणीची भूमिका साकारली होती. शिल्पाचा बॉलीवूडमधील प्रवास चढ-उतारांनी भरलेला होता. तिने २००९ मध्ये उद्योगपती राज कुंद्राशी लग्न केले. त्यांना वियान आणि समीक्षा अशी दोन मुले आहेत.