बिग बॉसमध्ये सध्या करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्यात बराच वाद झालेला पाहायला मिळत आहे. या दोघांचा वादाचं कारण शमिता शेट्टी असल्याचंही बोललं जात आहे. मागच्या काही दिवसांपासून शमिताचं नाव करण कुंद्राशी जोडलं जात असल्यानं या दोघांमध्ये वाद होत असल्याचं बोललं जात आहे. एवढंच नव्हे तर अनेकदा तेजस्वीनंही करण आणि शमिता यांच्या मैत्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या दोघांचं एकत्र बसून गप्पा मारणं तिला पसंत नसल्याचंही दिसून येतं.

या सगळ्यात मागच्या काही दिवसांपासून राखी सावंतनं करण आणि शमिता यांचं नाव एकमेकांशी जोडायला सुरुवात केली आहे. नुकत्याच झालेल्या ‘विकेंड का वार’मध्ये राखी सावंत, ‘करण आणि शमिताची जोडी चांगली दिसते. पण माहीत नाही तेजस्वी या दोघांच्या मध्ये का येतेय.’ असं सलमान खानला सांगताना दिसली.

राखी सावंतचं बोलणं ऐकून तेजस्वी प्रकाश भडकलेली पाहायला मिळाली. पण आता राखी सावंतच्या या वक्तव्यावर शमिताची बहीण आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीनंही प्रतिक्रिया दिली आहे. शमिता आणि शिल्पा यांचा मानलेला भाऊ राजीव अदातियानं पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात एंट्री केली आहे. तो घरातील सदस्यांसाठी काही मेसेज घेऊन आला आहे. ज्याचा प्रोमो नुकताच रिलीज झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजीव अदातियानं घरातील सदस्यांसाठी आणलेल्या मेसेजमध्ये एक मेसेज शिल्पा शेट्टीचा आहे. त्यात ती राखीला म्हणाली, ‘राखी हे सर्व बोलणं बंद कर प्लिज. एक कुंद्रा पुरेसा आहे आमच्या घरात आता.’ यात शिल्पाचा इशारा तिचा पती राज कुंद्राकडे होता. शिल्पाचं बोलणं ऐकून घरातील सदस्यांसह शमिता देखील जोरजोरात हसू लागतात. आता या सर्व गोष्टींचा तेजस्वी आणि करणच्या नात्यावर काय परिणाम हे पाहणं रंजक ठरणार आहे.