Dipika Kakar Health : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर काही दिवसांपासून तिच्या आरोग्याच्या समस्यांमुळे चर्चेत होती. या वर्षी मे महिन्यात दीपिकाने तिला दुसऱ्या टप्प्यातील यकृताचा कर्करोग झाल्याचे उघड केले होते.
गेल्या महिन्यात दीपिकाने यकृताच्या कर्करोगावर शस्त्रक्रिया केली. तिच्यावरील ही शस्त्रक्रिया १४ तास चालली आणि डॉक्टरांनी ट्यूमर काढून टाकला. सध्या दीपिका कर्करोगमुक्त आहे. दीपिका तिच्या घरी परतली आहे आणि ती आता पूर्वीपेक्षा खूपच बरी आहे.
दुसरीकडे शोएब वेळोवेळी त्याच्या व्लॉगद्वारे दीपिकाच्या आरोग्याच्या अपडेट्स शेअर करत राहतो. अशा परिस्थितीत आता शोएबने पुन्हा दीपिकाबद्दल आणखी एक अद्ययावत अशी माहिती दिली आहे.
दीपिकाची टार्गेटेड थेरपी झाली सुरू
शोएब इब्राहिमने त्याच्या नवीनतम व्लॉगमध्ये मुलगा रुहानबरोबरचा त्याचा दिवस कसा होता हे दाखवले. त्याबरोबरच शोएबने सांगितले, “दीपिकाची टार्गेटेड थेरपी आजपासून सुरू झाली आहे. आज पहिला दिवस आहे आणि आता तिला बरं वाटत आहे. पण, दुसऱ्या दिवशी दीपिकाला काही त्रास झाला. तिच्या तोंडात फोड आले.”
शोएब पुढे म्हणाला, “थेरपीनंतर दीपिकाने त्याला सांगितले की, तिला खूप थकवा जाणवत आहे; पण काही फरक पडत नाही. ती रुहानबरोबर बाहेर गेली होती. कदाचित म्हणूनच तिला थकवा जाणवत असेल. तोंडात फोड आल्याबद्दल दीपिका म्हणाली, “डॉक्टरांनी सांगितले होते की, अल्सर होऊ शकतात. त्यासाठी शक्य तितके पाणी प्यावे लागेल. म्हणून मी माझे पाण्याचे सेवन वाढवले. मला वाटते की, ते ठीक होईल.”
दीपिकावरील उपचार दोन वर्षे चालेल
शोएबने त्याच्या मागील व्लॉगमध्ये सांगितले होते की, डॉक्टरांनी दीपिकाला औषधे दिली आहेत. कारण- आता तिच्या शरीरात कर्करोग नाही. जर भविष्यात दीपिकाच्या शरीरात कर्करोगाच्या पेशी आढळल्या, तर डॉक्टर औषधाचा डोस वाढवतील आणि तिला आयव्हीद्वारे औषधे दिली जातील. शोएबने सांगितले की, तो पुढील आठवड्यापासून दीपिकावर उपचार सुरू करेल आणि दीपिकाचा उपचार सुमारे दोन वर्षे चालेल. दर तीन आठवड्यांनी दीपिकाचे स्कॅनिंग केले जाईल.
काही दिवसांपूर्वी दीपिकाने तिचा व्लॉगही शेअर केला होता. दीपिकाचा शस्त्रक्रियेनंतर हा पहिला व्लॉग होता. दीपिकाने यामध्ये तिच्या डाएटबद्दल सांगितले होते. तिच्यामुळे कुटुंबाचे प्लॅन रद्द होत आहेत याचे दीपिकाला वाईट वाटते. कोणाचाही वाढदिवस फारसा उत्साहात साजरा केला जात नाही. असं ती त्या व्लॉगमध्ये म्हणाली होती.