बॉलीवूड स्टार श्रद्धा कपूर ही इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचा शेवटचा चित्रपट ‘स्त्री २’ प्रचंड हिट झाला आणि तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या राजकुमार रावचेही कौतुक झाले.

या चित्रपटाने विक्रमी कमाई केली होती. आता सर्वांना त्यांच्या चित्रपटात श्रद्धा कपूरला कास्ट करायचे आहे. अलीकडेच बातमी आली की, एकता कपूरने तिच्या एका चित्रपटात श्रद्धा कपूरला कास्ट केले आहे. श्रद्धा कपूरने या चित्रपटासाठी तिचे मानधन वाढवल्याचेही बोलले जात आहे.

श्रद्धा कपूरने वाढवलं मानधन

बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, एकता कपूरच्या या चित्रपटासाठी श्रद्धा कपूरला १७ कोटी रुपये फी मिळाली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील महिला अभिनेत्रीला मिळालेली ही सर्वाधिक फी आहे. चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही. हा चित्रपट सध्या प्री-प्रॉडक्शन टप्प्यात आहे आणि या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत चित्रपट फ्लोरवर जाईल.

रिपोर्टसनुसार, श्रद्धा कपूरने ‘स्त्री २’साठी पाच कोटी रुपये घेतले होते. आता श्रद्धा कपूरने तिचे मानधन वाढवून ते थेट १७ कोटी रुपये केले आहे. ‘स्त्री २’नंतर श्रद्धा कपूरचा हा मोठा प्रोजेक्ट आहे. श्रद्धा कपूर आता आलिया भट्ट आणि कियारा अडवाणीनंतर सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रद्धा कपूर ‘स्त्री ३’मध्ये दिसणार

श्रद्धा कपूर ‘स्त्री ३’मध्येही काम करणार आहे. हा हॉरर कॉमेडी चित्रपट ऑगस्ट २०२७ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे वृत्त आहे. श्रद्धा कपूरने ‘३ पत्ती’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. यानंतर ती ‘लव्ह का द एंड’मध्ये दिसली. तिने ‘आशिकी 2’, ‘गोरी तेरे प्यार में’, ‘एक व्हिलन’, ‘हैदर’, ‘उंगली’, ‘एबीसीडी 2’, ‘बागी’, ​​’फ्लाइंग जट’, ‘रॉक ऑन 2’, ‘हाफ गर्लफ्रेंड’, ‘साहो’, ‘छिछोरे’, ‘बागी 3’, ‘तू झुठी में मक्कार’ यांसारखे चित्रपट केले आहेत.