मुंबईत सुरू असलेल्या एकता कपूरच्या ‘एक व्हिलन’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान अभिनेत्री श्रद्धा कपूरला दुखापत झाली आहे. या चित्रपटात मोटारसायकवरील दृश्य चित्रित करत असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे श्रद्धा कपूरच्या गुडघ्याला दुखापत झाल्याचे समजत आहे. दरम्यान श्रद्धा कपूर ‘मै तेरा हिरो’ चित्रपट यशस्वी झाल्याबद्दल आयोजित केलेल्या पार्टीला उपस्थित राहणार होती. मात्र, गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे आपण ‘मै तेरा हिरो’ चित्रपटाचा नायक वरूण धवनसोबत पार्टीला उपस्थित राहण्याची संधी आपण गमावली असल्याची भावना श्रद्धाने ट्विटरवरून व्यक्त केली. तसेच मला आता बरे वाटत असल्याचे सांगत अपघाताच्यावेळी डोक्यावर घातलेल्या हेल्मेटचे तिने ट्विटरवरून आभार मानले आहेत. त्यामुळे बाईक चालवताना सुरक्षिततेसाठी सगळ्यांनी हेल्मेट घालावे असा सल्लासुद्धा श्रद्धाने आपल्या चाहत्यांना दिला आहे. ‘एक व्हिलन’च्या चित्रिकरणादरम्यान सहकलाकार सिद्धार्थ मल्होत्रा याच्या मोटारसायकलशी स्पर्धा करताना श्रद्दाची मोटारसायकल घसल्यामुळे तिच्या गुडघ्याला दुखापत झाली.
बालाजी मोशन पिक्चर्स निर्माण करत असलेला ‘एक व्हिलन’ हा चित्रपट येत्या २७ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र, प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाच्या ट्रेलरला अवघ्या दोन दिवसांमध्ये प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Apr 2014 रोजी प्रकाशित
‘एक व्हिलन’च्या चित्रिकरणादरम्यान श्रद्धा कपूरला दुखापत
मुंबईत सुरू असलेल्या एकता कपूरच्या 'एक व्हिलन' या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान अभिनेत्री श्रद्धा कपूरला दुखापत झाली आहे.
First published on: 10-04-2014 at 04:18 IST
TOPICSएक व्हिलन
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shraddha kapoor injured while shooting for ek villain