बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमॅन राज कुंद्राला पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि पॉर्न अ‍ॅपप्रकरणी १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. आता अभिनेत्री श्रुति गेराने आणखी काही खुलासे केले आहेत. तिने सांगितलं की नवीन अभिनेत्रींना ड्रग्स देऊन त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ शूट केले जातात आणि त्यानंतर त्यांना पॉर्न चित्रपटांमध्ये काम करायला भाग पाडले जाते.

‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, श्रुतिला २०१८ मध्ये एका कास्टिंग दिग्दर्शकाने राज कुंद्राच्या वेब सीरिजमध्ये काम करण्यासाठी विचारल्याचे तिने सांगितले. “मला कोणत्या कास्टिंग डायरेक्टर्सने फोन केला होता हे आठवत नाही. मात्र, एकाने मला सांगितले की तो माझी ओळख राज कुंद्राशी करून देईन, दुसऱ्याने सांगितले की राज त्याचं प्रोडक्शन हाऊस सुरु करण्याचा विचार करत आहे आणि तो वेब सीरिज सुरु करणार आहे. मी लगेच नाही म्हणाले. तेव्हा मी नाही म्हणाली यासाठी आता मी स्वत:ची आभारी आहे. आम्हाला सगळ्यांना वाटलं की तो एक चांगला आणि मोठा माणूस आहे पण तो तर अश्लील चित्रपट बनवतो,” असे श्रुतिला म्हणाली.

आणखी वाचा : पतीच्या अटकेनंतर शिल्पाची भावनिक पोस्ट, केली ‘ही’ विनंती

 

View this post on Instagram

 

A post shared by Shruti Gera (@shrutigera)

आणखी वाचा : ‘तिला हाडांच्या डॉक्टरांची गरज आहे..’, बॉडी पॉश्चरमुळे नोरा झाली ट्रोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे नवीन येणाऱ्या कलाकारांसोबत चित्रपटसृष्टीत कसे वागतात या विषयी श्रुति म्हणाली, “या चित्रपटसृष्टीत बरचं काही घडलं आहे. नवीन अभिनेत्रींना ड्रग्स दिले जातात, त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ शूट केले जातात आणि त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून अश्लील चित्रपट करण्यास भाग पाडले जाते. हे फक्त अभिनेत्रींना नाही तर अभिनेत्यांसोबतही केले जाते.”