छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पलक ही श्वेताच्या पहिल्या पतीची राजा चौधरी यांची मुलगी आहे. श्वेता आणि राजचा घटस्फोट हा २००७ मध्ये झाला. त्यानंतर पलक ही तिच्या आईसोबत राहू लागली. अवघ्या १३ वर्षांनंतर राजा त्याच्या मुलीला भेटला आहे. मुलीला भेटून भावूक झालेल्या राजाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

राजाने इन्स्टाग्रामवर पलकसोबत एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत पलकने काळ्यारंगाचे कपडे परिधान केले आहेत. तर राजाने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. “जीवनाचा महत्त्वाचा क्षण” या आशयाचे कॅप्शन राजाने तो फोटो शेअर करत दिले आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुलीला १३ वर्षांनंतर भेटल्यानंतर राजाला कसे वाटले ते त्याने सांगितले आहे. “मी आणि पलक व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होतो. मी तिला दररोज गूड मॉर्निंगचा मेसेज करतो. पण आम्ही प्रत्यक्षात कधी भेटलो नव्हतो. मी माझ्या आई-वडिलांसोबत मेरठ मध्ये राहतो. काही कामा निमित्त मी मुंबईत आलो होतो. मुंबईला आल्यानंतर मी पलकला फोन केला तेव्हा ती तिच्या चित्रपटाची तयारी करत असल्याचे मला समजले. त्यातुन तिने वेळे काढला आणि आम्ही अंधेरीतील एका हॉटेलमध्ये भेटलो. जवळपास दीड तास आम्ही गप्पा मारत होतो. त्यावेळी आम्ही भूतकाळच्या कोणत्याही गोष्टींवर चर्चा केली नाही. मी तिला माझ्या कुटुंबाबद्दल सांगितले आणि ती माझ्या कुटुंबाला भेटण्यासाठी खूप उत्सुक होती. मी त्यांना भेटायला येईल असे पलक मला म्हणाली.” असे राजा म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ते म्हणाले, “पलकला भेटण्याची त्याला परवानगी नव्हती, परंतु तिच्यावरील माझे प्रेम अजिबात कमी झाले नाही. माझ्यात आणि पलकमध्ये गोष्टी पूर्वीसारख्या करण्यासाठी मला ही दुसरी संधी मिळाली आहे. पलकला भेटल्यानंतर तिचा स्वभाव आणि तिची वागणूक किती चांगली आहे हे मला समजले. त्याचे पूर्ण श्रेय हे माझ्या पुर्वाश्रमीची पत्नी श्वेता तिवारीला जाते.”