नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट नुकतंच प्रदर्शित झाला. या चित्रपटात बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. सध्या ‘झुंड’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. अनेक समीक्षकांनी या चित्रपटाची स्तुती केली आहे. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार झुंड चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसत आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव याने नुकतंच या चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने नागराज मंजुळे आणि झुंड चित्रपटाचे कौतुक केले आहे. सिद्धार्थ जाधव हा इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर नागराज मंजुळेंसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. तर दुसऱ्या फोटोत संगीतकार अजय अतुल आणि नागराज मंजुळे दिसत आहे. त्याला कॅप्शन देताना त्याने 'झुंड' चित्रपटाचे कौतुक केले आहे. सिद्धार्थ जाधवची इन्स्टाग्राम पोस्ट "तुम्ही आमचं अस्तित्व नाकारूच शकत नाही…नागराज मंजुळे भावा… अप्रतिम हा शब्द फक्त नावाला आहे.. त्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर "झुंड" पाहायलाच हवा…स्वप्न प्रत्येकाची असतात.. पण ती पूर्ण करण्याची धमक 'झुंड'मध्ये होती, आहे आणि कायम राहणार.. हे तू पुन्हा एकदा सिद्ध केलस… अभिमान वाटतो तुझा… "अपून की बस्ती गटर मे है… पर तुम्हारे मन मे गंद है"….या ओळी मनातून जातच नाहीत… अजय अतुल दादा… माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि ते कायमच राहिल. कलाकारांच्या कामाबद्दल मी काय बोलणार…"""बच्चों से लेकर बच्चन तक"…. सगळेच वरचा क्लास…जे जगणं आहे तेच नागराजने खरंखरं मांडलय….माणसाच्या माणुसकीचा प्रवास… झुंड… नक्की बघा नाही.. पहायलाच हवा..", अशी पोस्ट सिद्धार्थ जाधवने केली आहे. सध्या सिद्धार्थची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. नागराज मंजुळेंचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘झुंड’ प्रदर्शित, पहिल्या दिवशी कमवले इतके कोटी दरम्यान, ‘झुंड’ हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.