अभिनेता सिद्धार्थ जाधव कुटुंब प्रमुख म्हणून अगदी शोभून दिसतो. याचं कारण म्हणजे आपल्या कामामध्ये सिद्धार्थ कितीही व्यग्र असला तरी तो कुटुंबाला वेळ देणं विसरत नाही. सिद्धार्थला ईरा आणि स्वरा अशा दोन गोड मुली आहेत. या दोन मुलींना घेऊन सिद्धार्थ दुबई ट्रिपला गेला होता. यादरम्यानचे त्याने काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये त्याचं त्याच्या लेकींवर किती प्रेम आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे.

आणखी वाचा – De Dhakka 2 Teaser : “थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय”, ‘दे धक्का २’चा धमाकेदार टीझर पाहिलात का?, नव्या अभिनेत्रीची एण्ट्री

कामामधून निवांत वेळ मिळताच सिद्धार्थ ईरा आणि स्वरा या आपल्या दोन मुलींना घेऊन दुबई ट्रिपला गेला होता. या ट्रिपदरम्यान सिद्धार्थने आपल्या मुलींबरोबर खूप धम्माल-मस्ती केली. त्याने काही व्हिडीओ देखील त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. यामध्ये सिद्धार्थ दोन्ही मुलींना खांद्यावर घेऊन दुबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे.

इतकंच नव्हे तर त्याने दुबईच्या मॉलमध्ये देखील लेकीला खांद्यावर घेतलं होतं. ही दुबई ट्रिप त्याच्यासाठी अविस्मरणीय होती. तसेच मुलीबरोबर लहान होत पाळण्यामध्ये बसून त्याने दुबईचं संपूर्ण दृश्य पाहण्याची मजा घेतली. व्हिडीओ शेअर करताना सिद्धार्थने “बाप म्हणजेच मित्र” असं म्हटलं आहे. तसेच सिद्धार्थच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची देखील अधिक पसंती मिळताना दिसत आहे.

आणखी वाचा – VIDEO : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेता अजूनही राहतो चाळीत, शेअर केला घराचा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००७मध्ये सिद्धार्थने तृप्तीशी लग्न केलं. सिद्धार्थ आपल्या पत्नीचं देखील नेहमीच कौतुक करताना दिसतो. एका डान्स रिअॅलिटी शोमध्येही सिद्धार्थ-तृप्तीने सहभाग घेतला होता. यावेळी दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे स्पष्टपणे दिसून आलं. सिद्धार्थ खरंच एक उत्तम फॅमिली मॅन आहे असं म्हणायला हरकत नाही.