जगभरातील कोट्यवधी लोकांची मने जिंकणाऱ्या सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलची जोडी यांना वेगळ्या परिचयाची गरज नाही. ‘बिग बॉस 13’ मध्ये जेव्हापासून ते एकत्र दिसले तेव्हापासून त्यांची चमकदार केमिस्ट्री आणि निस्वार्थी मैत्री चर्चेत कायम चर्चेत आलीय. या जोडीचे चाहते त्यांना पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी कायम आतुर असतात. त्यांचा ‘सिलसिला सिदनाज का’ हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर, हे रोमॅण्टिक कपल आता वूटवरील ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात एकत्र दिसणार आहेत. यंदाच्या वीकेंड स्पेशल एपिसोडमध्ये हे पॉवर कपल घरात एन्ट्री करणार आहेत.
‘बिग बॉस’ ओटीटी घरात प्रवेश करण्यासाठी सिदनाजची प्रेरणा काय आहे? त्यांना गुरु आवडतात की स्पर्धक? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांसह सिदनाजला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल हे दोघेही ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात प्रवेश करण्यासाठी खूप उत्साहित आहेत. तो पुन्हा एकदा शहनाजसोबत ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात धमाल करताना दिसून येणार आहे. या दरम्यान, सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल शोचा होस्ट करण जोहरसोबत संवाद साधताना दिसतील.

घरात प्रवेश करण्याबाबत बोलताना सिद्धार्थ शुक्ला म्हणाला, “ठीक आहे, बिग बॉससाठी माझ्या मनात एक विशेष जागा आहे. यामुळे मला माझी ओळख परत मिळाली आणि प्रेक्षकांना या शोच्या माध्यमातून खऱ्या सिद्धार्थबद्दल माहिती मिळाली.” यापुढे तो म्हणाला, “माझा बिग बॉसचा प्रवास शहनाज आणि ज्यांनी मला मनापासून पाठिंबा दिला आहे त्या इतर सहकाऱ्यांशिवाय झाला नसता. आज पुन्हा एकदा मी माझी सर्वात चांगली मैत्रीण शहनाजसोबत बिग बॉस ओटीटीच्या घरात प्रवेश करतोय.”
“मी पुन्हा एकदा बिग बॉसच्या घराचा अनुभव घेण्यासाठी आणि कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधण्यासाठी आणि अर्थातच रविवार का वार दरम्यान करण जोहरला भेटण्यासाठी उत्सुक आहे.”, असं देखील यावेळी सिद्धार्थ शुक्ला म्हणाला.