देशात सगळ्यात जास्त चर्चेत असलेला शो ‘बिग बॉस १३’ च्या विजेतेपदाचा मान आपल्या नावे केलेल्या अभिनेता सिद्धार्थ शुक्ला गेल्या काही दिवासांपूसन बराच चर्चेत आलाय. अभिनेता सिद्धार्थ शुक्ला हा त्याच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असलेल्या वेगवेगळ्या पोस्टमुळे सध्या चर्चेत येतोय. सिद्धार्थ शुक्लाची काल ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’ ही नवी वेब सीरिज सुद्धा रिलीज झालीय. या नव्या वेब सीरिजसाठी त्याचे फॅन्स देखील आतुरले होते. सिद्धार्थ शुक्लाच्या इतर प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर अभिनेता सैफ अली खान आणि प्रभासचा आगामी चित्रपट ‘आदिपुरुष’ मध्ये तो महत्त्वाची भूमिका करणार असं बोललं जातंय. पण यात किती तथ्य आहे हे स्वतः सिद्धार्थ शुक्लाच सांगू शकतो. अनेक दिवसांपासून या चर्चांवर आता स्वतः सिद्धार्थने मौन सोडलंय.

तरीही अभिनेता सैफ अली खान आणि प्रभासच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटात तो काम करू शकतो, अशी माहिती समोर आली आहे. याच विषयावर सिद्धार्थने फिल्मफेअरला एक मुलाखत दिलीय. यात तो म्हणाला, “माझ्यावर विश्वास ठेवा, मला अजुन तरी ‘आदिपुरुष’ चित्रपटासाठी कोणतीच ऑफर आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर अशा अफवा का पसरवल्या जात आहेत आणि यात किती सत्य आहे हे मला माहिती नाही. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी माझ्यासमोर कोणत्याच भूमिकेचा प्रस्ताव अजुन तरी ठेवलेला नाही.”

विशेष म्हणजे, ‘तानाजी द अनसंग वॉरियर’ चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत हे ‘आदिपुरूष’ हा बड्या बजेटचा चित्रपट भेटीला घेऊन येत आहेत. त्यांचा हा चित्रपट एका पौराणिक कथेवर आधारित असणार आहे. यात अभिनेता सैफ अली खान हा ‘रावण’च्या भूमिकेत झळकणार आहे. तर दक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार प्रभास हा सुद्धा या चित्रपटात ‘राम’ च्या भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच अभिनेत्री कृती सेनन देखील ‘सिता’च्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाला हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्ल्याळम भाषेत रिलीज करण्यात येणार आहे.

तर दुसरीकडे ‘आदिपुरुष’ चित्रपटावर काम सुरू होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. एका मुलाखतीत अभिनेता सैफ अली खानने सांगितलं, ” ‘आदिपुरुष’ चित्रपटात मी जी भूमिका करणार आहे ती ‘रावण’ची असणार आहे. रावणाची भूमिका ही माननीय असणार आहे. म्हणजेच रावणाला एका खलनायकाच्या नव्हे तर एका हिरोच्या रूपात दाखवण्यात येणार आहे.” सैफ अली खानच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. काही लोकांनी तर या चित्रपटाला विरोध केला होता. तसंच चित्रपटात कोणत्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये असं देखील सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Om Raut (@omraut)

सैफने केलेल्या वक्तव्यावर मोठा वाद निर्माण झाल्यानंतर अखेर अभिनेता सैफने माघार घेतली आणि त्याने केलेलं वक्तव्य मागे घेतलंय. रावणाची भूमिका करणं हे त्याच्यासाठी मोठं आव्हान असणार आहे, असं देखील त्याने एका मुलाखतीत सांगितलं.