अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणी प्रमुख भूमिका असलेली ‘शेरशाह ‘ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. हा चित्रपट बॉलिवूडमधील सुपर हिट चित्रपट ठरला आहे. यातील सिद्धार्थ आणि कियारा या नवीन जोडीची केमिस्ट्री आणि परफॉर्मन्स प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. ‘शेरशाह ‘ हा चित्रपट आयएमडिबी वर सर्वाधिक रेटिंग मिळणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाला ८.९ आयएमडिबी रेटिंग मिळाले आहे.
विष्णु वर्धन दिग्दर्शित ‘शेरशाह ‘ हा चित्रपट कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण, त्यातील असलेले संवाद, कलाकारांचा अभिनय याला प्रेक्षक आणि क्रिटीक्स कडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अॅमेझॉन प्राइमवरील या चित्रपटाला आयएमडिबीवर १० पैकी ८.९ रेटिंग मिळाले असून ६४,००० आयएमडिबी युजर्सने या चित्रपटासाठी वोट केलं आहे. तसंच हा चित्रपट या आठवड्यातील आयएमडिबी प्रो, मूव्ही मिटरवर टॉप १० ट्रेंडिंग चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. या चित्रपटाच्या यशाबद्दल बोलत असताना धर्मा प्रॉडक्शनचे सी.इ.ओ अपूर्व मेहता म्हणाले की, ” या चित्रपटाचे यश पाहून आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. ‘शेरशाह ‘ या चित्रपटाची कथा खरच खूप खास आहे जी सर्वांनी पाहणे आवश्यक आहे. चित्रपटाचे आयएमडिबी रेटिंग हे प्रेक्षकांनी केलेलं चित्रपटाचे कौतुक आहे. तसेच यातील कलाकार, आणि दिग्दर्शक आणि संपूर्ण टीम यांच्या कठोर परिश्रमाचे हे यश आहे. आम्ही बत्रा कुटुंबाचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही वीर कथा सांगण्याची संधी दिली. कॅप्टन विक्रम बत्रा (पीव्हीसी) आणि त्याच्या शौर्याची आणि बलिदानाची अमर कथा जगासमोर आणण्यास मदत केल्याबद्दल अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे आभार.”
View this post on Instagram
‘शेरशाह’ या चित्रपटाचे निर्माता शब्बीर बॉक्सवाला यांनी सांगितलं की, “शेरशाह” हे आमचे प्रेम आहे आणि प्रेक्षकांचे प्रेम पाहून आम्हाला अभिमान वाटत आहे. या प्रेरणादायी कथेला पाठिंबा दिल्याबद्दल प्रचंड अभिमान वाटतो. या खरोखर प्रेरणादायी कथेला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही बत्रा कुटुंब, भारतीय सैन्यदल आणि प्रेक्षकांचे सदैव आभारी आहोत. विक्रम बत्रा यांची कथा अशा अनेक वीरकथांपैकी एक आहे. आणि ही कथा आम्हाला सांगायची संधी मिळाली याचा आम्हाला आनंद आहे.” हा चित्रपट फॅन्सना नक्की आवडेल आणि आयएमडिबी रेटिंगमुळे हा चित्रपट अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचेल.
View this post on Instagram
शेरशाह’या चित्रपटाद्वारे १९९९ सालातील कारगीलच्या युद्धात कॅप्टन विक्रम बत्रा त्यांनी दिलेल्या बलिदानाला मानवंदना देण्यात आली आहे. आपले ‘शेरशाह’हे नाव सार्थ करत कॅप्टन बत्रा यांनी दिलेला साहसी लढा आणि त्यांना आलेले वीरमरण भारताच्या विजयामध्ये महत्त्वाचे ठरले. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीसोबत शिव पंडित, राज अर्जुन, प्रणय पचौरी, हिमांशू अशोक मल्होत्रा, निकितिन धीर, अंकिता गोराया, अनिल चरणजीत, साहिल वैद, शताफ फिगर आणि पवन चोप्रा देखील महत्वाची भूमिका साकारत आहेत.