Entertainment News Updates 25 June 2025 : बॉलीवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ असलेल्या आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ हा सिनेमा २० जून २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमाच्या अपयशानंतर जवळपास ३ वर्षांनी आमिर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर परतला आहे. ‘सितारे जमीन पर’मध्ये त्याच्यासह अभिनेत्री जिनिलीया देशमुख प्रमुख भूमिकेत झळकली आहे. आमिरच्या ‘सितारे जमीन पर’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केलीये जाणून घेऊयात…
‘सितारे जमीन पर’ सिनेमाने भारतात पहिल्यादिवशी १०.७ कोटींची कमाई केल्याचं वृत्त इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलं होतं. यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी या सिनेमाने अनुक्रमे २०.२ कोटी, २७.२५ कोटी आणि ८.५ कोटींची कमाई केली. मंगळवारी ( २४ जून-पाचवा दिवस ) या सिनेमाने जवळपास ८.५० कोटींचा गल्ला जमावल्याचं वृत्त सॅकनिल्कने दिलं आहे. यामुळे सिनेमाचं एकूण कलेक्शन ७५.१५ कोटी एवढं झालं आहे.
Entertainment New Updates 25 June 2025
"साजिद खानने मला शिवी दिली होती", ईशा गुप्ताने सांगितला सेटवरील भांडणाचा 'तो' प्रसंग; अभिनेत्री MeeToo बद्दल म्हणाली…
परदेशात अडकलेला 'छावा' फेम अभिनेता, भारतात परतताच सोडला सुटकेचा निश्वास; म्हणाला, "घरी गरोदर बायको…"
परीक्षा द्यायला गेलेल्या बॉलीवूड अभिनेत्याभोवती जमली चाहत्यांची तुफान गर्दी, 'या' विषयात घेत आहे शिक्षण; साधेपणाचं कौतुक
Video : "आयुष्यात पहिल्यांदा वारी अनुभवली…", 'स्टार प्रवाह'च्या नायिकेने वारकऱ्यांसाठी बनवल्या भाकऱ्या, म्हणाली…
'सरदारजी ३'च्या वादावर निर्मात्यांची प्रतिक्रिया; हानिया आमिरबद्दल म्हणाले, "पाकिस्तानी कलाकार…"
"तिचं लग्न ही आमची चूक होती", मुलीच्या घटस्फोबद्दल दिग्गज अभिनेत्याची प्रतिक्रिया; म्हणाले, "आम्ही लग्नासाठी जबरदस्ती…"
आमिर खानमुळे 'या' मराठमोळ्या अभिनेत्याची बॉलीवूड चित्रपटात झळकण्याची हुकलेली संधी; स्वत: दिग्दर्शक म्हणाले, "त्याने सर्वांना काढून…"
"सरकार कोणाचंही असो…", शशांक केतकरच्या तक्रारीची BMC ने घेतली दखल; अभिनेत्याने शेअर केला नवीन व्हिडीओ
"My Lolo हे वर्ष आपल्यासाठी खूप कठीण…", करिश्माच्या वाढदिवसानिमित्त करीना कपूरची भावनिक पोस्ट, शेअर केला 'तो' खास फोटो
"तिच्याबरोबर कधीच…", वल्लरी विराजने सांगितला शर्मिला शिंदेसह काम करण्याचा अनुभव; 'नवरी मिळे हिटलरला'मधील खास फोटो शेअर करत म्हणाली…
वीण दोघांतली ही तुटेना : तेजश्री प्रधानची नवीन मालिका हिंदीची कॉपी? प्रोमो पाहून नेटकऱ्यांच्या कमेंट्स, म्हणाले…
हार्दिक पंड्याने ८ वर्षांनी मोठ्या बॉलीवूड अभिनेत्रीला केलंय डेट? तिने अनेक वर्षांनी सोडलं मौन; म्हणाली, "हो आम्ही काही महिने…"
Sitaare Zameen Par Box Office Collection : आमिर खानच्या सिनेमाने किती कमाई केली जाणून घ्या...
Sitaare Zameen Par Box Office Collection Day 5 : आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ५ दिवसांत किती कमाई केली? जाणून घ्या...
पहिला दिवस - १०.७ कोटी ( शुक्रवार २० जून )
दुसरा दिवस - २०.२ कोटी ( शनिवार २१ जून )
तिसरा दिवस - २७.२५ कोटी ( रविवार २२ जून )
चौथा दिवस - ८.५ कोटी ( सोमवार २३ जून )
पाचवा दिवस - ८.५० कोटी* ( मंगळवार २४ जून )
एकूण कलेक्शन - ७५.१५ कोटी
आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' सिनेमाचं मूळ बजेट ९० कोटींच्या घरात आहे. त्यामुळे लवकरच हा सिनेमा आपलं मूळ बजेट वसूल करेल असा अंदाज बांधला जात आहे.
आमिर खानचा 'सितारे जमीन पर' सिनेमा २० जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये आमिरसह अभिनेत्री जिनिलीया देशमुख प्रमुख भूमिकेत झळकली आहे. याशिवाय आरएस प्रसन्ना यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.