केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी या सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. त्या नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतंच स्मृती इराणी यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यात स्मृती इराणी यांचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेमुळे स्मृती इराणी या प्रसिद्धीझोतात आल्या. यात त्यांनी ‘तुलसी विरानी’ ही भूमिका साकारली होती. मात्र त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सध्या स्मृती इराणींचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. स्मृती इराणी यांनी चार दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. यात त्यांनी छान साडी परिधान केली असून केस मोकळे सोडले आहे.

तसेच यावेळी त्या एका बहरलेल्या झाडाकडे पाहून फूल तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्या म्हणाल्या की, “जिथे पोहोचणं अशक्य आहे, तिथेच बहार आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. त्यासोबतच त्यांनी ‘फुले तोडू नका’, असा सामाजिक संदेशही त्यांनी दिला आहे.

दरम्यान त्यांचा हा फोटो पाहून त्यांनी वजन घटवल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे त्यांचे आधीचे काही फोटो पाहून त्या फॅट टू फिट होण्याच्या प्रयत्नात असल्याचेही दिसत आहे. स्मृती इराणी यांचा फोटो पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. “मस्तच….वेट लॉस केलं का? फारच छान,” अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. तर एका दुसऱ्या युजरने म्हटले की, “मॅडम तुम्ही तुमचे वजन फार कमी केलं आहे, काही टिप्स द्या.” तर एकाने तुम्ही “फार फिट दिसताय,” अशी कमेंट केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्मृती इराणी यांनी वयाच्या २१ व्या वर्षी फेमिना मिस इंडिया (१९९८) या सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेमुळे ‘तुलसी विरानी’ ही भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रचंड गाजली. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी राजकारणात प्रवेश केला.