अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांचा अॅक्शन ड्रामा ‘तेवर’ हा चित्रपट ५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्याचे चित्रीकरण ५मे ला मुंबईत करण्यात येणार आहे असून, जूनमध्ये वाराणसीत त्याचे चित्रीकरण पूर्ण केले जाईल.
तेवर हा तेलगू चित्रपट ओक्कडूचा रिमेक असून, दिग्दर्शित अमित शर्मा या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. संजय कपूर याची निर्मिती करत आहे. ‘तेवर’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करताना मला फार आनंद होत आहे. ५ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल. ठरल्याप्रमाणे चित्रपटाचे काम होत असून, त्याच्या प्रगतीने आम्ही खूप खूश आहोत, असे संजय म्हणाला.
संग्रहित लेख, दिनांक 5th May 2014 रोजी प्रकाशित
सोनाक्षी-अर्जुनचा ‘तेवर’ ५ डिसेंबरला प्रदर्शित होणार
अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांचा अॅक्शन ड्रामा 'तेवर' हा चित्रपट ५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

First published on: 05-05-2014 at 10:59 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonakshi arjuns tevar to release on december