बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर आणि तिचा कथित प्रियकर आनंद आहुजा नेहमीच चर्चेत असतात. बॉलिवूड वर्तुळात या दोघांच्या प्रेमाची चर्चा चांगलीच रंगताना दिसते. दोघांनी प्रेम जाहीररित्या मान्य केले नसले, दोघांनीही प्रेमाच्या रंगणाऱ्या चर्चा नाकारल्याचेही दिसत नाही. आनंद आहुजा अनेकदा सोनम कपूरच्या कुटुंबियांसोबत देखील दिसला आहे. कही दिवसांपूर्वी सोनमच्या कुटुंबियासोबत आनंदने व्यतीत केलेले काही क्षण सोशल मीडियाद्वारे शेअरही करण्यात आले होते. ते फोटो पाहता आनंदसुद्धा कपूर कुटुंबाचाच एक भाग असल्यासारखे वाटत आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये आनंदला त्याच्या स्टाइल क्रश विषयी प्रश्न विचारण्यात आला होता.
‘वोग’ या लोकप्रिय मासिकाला दिलेल्या मुलाखतीवेळी पेशाने व्यावसायिक असणाऱ्या आनंदने त्याच्या क्रश विषयी सांगितले. यावेळी त्याने सोनम कपूरचे नाव सांगितले. त्यामुयले सोनम कपूर त्याची प्रेयसी आहे की, क्रश? हाच प्रश्न सध्या अनेकांच्या मनात घर करु लागला आहे. क्रशबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना आनंदने सोनमचे नाव घेतले. त्यामुळे आता या दोघांमधील नात्याला नक्की काय नाव द्यायचे असाच प्रश्नही अनेकांना पडत आहे.
दरम्यान, सोनम कपूरने गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘नीरजा’ चित्रपटातील अभिनयाने देखील प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार देखील प्राप्त झाला होता. सोनमच्या आगामी चित्रपटाबाबत बोलायचे तर, ‘वीरे दी वेडिंग, ‘पॅडमॅन’ आणि ‘दत्त’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाशिवाय सोनमची उपलब्धी सांगायचे तर स्वतःचे डिजिटल स्टिकर असणारी सोनम कपूर ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरल्यामुळे सध्या तिच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सोनमने आतापर्यंत साकारलेल्या विविध भूमिकांच्या रुपात हे डिजिटल स्टिकर बनवण्यात आले आहेत. असे हे बहुरंगी आणि बहुढंगी डिजिटल स्टिकर लवकरच प्रदर्शित केले जाणार असून सोनमच्याच सिग्नेचर अॅपवर ते उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. सोनम ही पहिली भारतीय अभिनेत्री आहे जिचे स्वतःचे अॅप लॉन्च झाले आहे.