बॉलिवूड अभिनेता सोनू सूद गेल्या वर्षीपासून कोणत्या ना कोणच्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. दरम्यान, सोनू सूदने ‘फादर्स डे’च्या निमित्ताने त्याच्या मुलाला एक गाडी भेट म्हणून दिल्याचे समोर आले आहे. सोनूने काळ्या रंगाची मिर्सिडीज मेबाच जीएलएस ६०० इशांतला भेट म्हणून दिली आहे. या गाडीची किंमत ३ कोटी रुपयांच्या जवळपास असल्याचे म्हटले जात आहे.

आणखी वाचा : ‘निर्मात्याने मला हॉटेल रूममध्ये…’, नीना गुप्ता यांनी सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव

माहितीनुसार, मर्सिडीज मेबाच जीएलएस ६०० ही गाडी गेल्या आठवण्यातच भारतात लॉन्च करण्यात आली आहे. याचा व्हिडीओ युट्यूबवर प्रचंड व्हायरल होताना दिसतं आहे. या व्हिडीओ सोनूकडे या गाडीची डिलिव्हरी झाल्याचे दिसतं आहे. त्यानंतर सोनू त्याच्या कुटुंबाला ड्राईवर घेऊन जात असल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा : आलियाने शेअर केलं बेडरूम सिक्रेट; सेक्स पोजीशनबद्दल केलं भाष्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनूकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. सोनूला गाड्यांची आवड आहे. सोनूकडे आधीपासून ऑडी क्यू 7, मर्सिडीज बेंझ एमएल क्लास आणि पोर्शे पानामेरा आहे. दरम्यान, सोनू लवकर ‘पृथ्वीराज’, ‘अल्लुडू अधुर्स’, ‘आचार्य’ आणि ‘थमिलरसन’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.