scorecardresearch

‘बियरसोबत शेव चालेल का?’ सोनू सूदनं दिली ऑफर; वाचा नेमकं काय घडलं

सोनू सूदच्या ट्वीटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

sonu sood, sonu sood tweet, sonu sood offered bhujiya, sonu sood twitter, सोनू सूद, सोनू सूद ट्विटर, सोनू सूद व्हायरल ट्वीट
सोनू सूदचं एक ट्वीट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतंय ज्यात त्यानं बियरसोबत शेव देखील ऑफर केली आहे.

अभिनेता सोनू सूद त्याच्या चित्रपटसृष्टीतील कामापेक्षा जास्त सामाजिक कार्यासाठी ओळखला जातो. संपूर्ण करोना काळात त्यानं ज्याप्रकारे देशभरातील लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत केली त्याचं सर्वत्र कौतुक झालं आहे. अनेकांनी त्यावेळी ट्विटरवरून सोनू सूदकडे मदत मागितली होती आणि विशेष म्हणजे सोनूनं अनेकांना अशाप्रकारे मदत केली. त्यानंतर आता सोनू सूदचं एक ट्वीट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतंय ज्यात त्यानं बियरसोबत शेव देखील ऑफर केली आहे.

सोनू सूदनं करोना काळात केलेल्या मदतीनंतर आता एका युजरनं त्याला आपल्या ट्वीटमध्ये टॅग करत एक मीम शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये लिहिलंय, ‘थंडीमध्ये ब्लँकेट दान करणारे आता उन्हाळ्यात थंड बियर नाही देणार का?’ या ट्वीटमध्ये सोनू सूदला टॅग करण्यात आलं आणि त्यानंही यावर मजेदार उत्तर दिलं.

आणखी वाचा- Video: एक्स गर्लफ्रेंड कतरिनासमोर आलियानं रणबीर कपूरला केलं प्रपोज अन्…

सोनू सूदचं ट्वीट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. युजरनं केलेल्या या मागणीला उत्तर देताना सोनूनं त्याला बियरसोबत शेव देखील ऑफर केली. सोनू सूदनं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘बियरसोबत शेव (भूजिया) चालेल का?’ यासोबत त्यानं हसणारा इमोजी देखील पोस्ट केला आहे.

आणखी वाचा- “सुरी पाहिल्यावर मला संजय राऊत आठवतात” किशोरी पेडणेकर यांचा Video चर्चेत

सोनू सूदच्या कामाबद्दल बोलायचं तर तो आगामी काळात ‘पृथ्वीराज’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात मानुषी छिल्लर आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय तो लवकरच ‘रोडीज’मधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानं रणविजयला रिप्लेस केलं असून या शोचा प्रीमियर येत्या ८ एप्रिलला होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-04-2022 at 12:08 IST

संबंधित बातम्या