दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे साई पल्लवी. अभिनयाबरोबरच ती नो-मेकअप लूक आणि भन्नाट डान्समुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी एका फोटोमुळे तिच्या लग्नाची चर्चा रंगली होती. पण या अफवांवर साईने नाराजी व्यक्त करून त्या फोटोमागची सत्य घटना सांगितली. साई ही तीन सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तेलुगू, तमिळ, मल्याळम या तीन सिनेसृष्टीत तिने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. आता ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. अशा लोकप्रिय अभिनेत्रीबाबत जाणून घ्या सर्वकाही…

हेही वाचा – Bigg Boss 17: ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वात झळकणार १२ सेलिब्रिटी, अंकिता लोखंडेसह ‘ही’ नावं आली समोर

९ मे १९९२ साली साई पल्लवीचा तमिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील कोटागिरी येथे जन्म झाला होता. बडगा आदिवासी कुटुंबात तिचा जन्म झाला होता. तिचं पूर्ण नाव साई पल्लवी सेंथमराय असं आहे. तिच्या वडिलांचं नाव सेंथमराय कन्नन आणि आईचं नाव राधा कन्नन आहे. साई पल्लवीचे वडील केंद्रीय उत्पादन शुल्क अधिकारी होते. साईला एक छोटी बहीण आहे, जिचं नाव पूजा कन्नन आहे. पूजा देखील एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे.

हेही वाचा – परिणीती चोप्रानंतर आता विद्युत जामवाल अडकणार लग्नबंधनात? जाणून घ्या कोण आहे होणारी पत्नी

खरंतर साईचे मूळ गाव कोईम्बतूर असून तिचे इथेच शालेय पूर्ण झालं आहे. एविल कॉन्वेंट स्कूल असं त्या शाळेचं नाव आहे. साई एमबीबीएस डॉक्टर आहे. एमबीबीएसचं शिक्षण तिनं त्बिलिसी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये घेतलं आहे.

हेही वाचा – दाक्षिणात्य सुपरस्टारसह जान्हवी कपूर करणार रोमान्स, तर सैफ अली खान साकारणार ‘ही’ भूमिका, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

पिंकविलाच्या वृत्तानुसार, साई पल्लवी रणबीर कपूरबरोबर ‘रामायण’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करू शकते. या चित्रपटात साई सीता मातेच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. ‘रामायण’ या चित्रपटाचे शूटिंग २०२४च्या सुरुवातीला सुरू होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी व्यतिरिक्त ‘केजीएफ २’ फेम यश देखील झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. नीतेश तिवारी हा चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत.