बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची आज जयंती आहे. श्रीदेवी यांचा जन्म हा १३ ऑगस्ट १९६३ मध्ये झाला होता. आज त्यांच्या प्रत्येक चाहत्याला त्यांची आठवण येत आहे. त्यांच्या सगळ्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात चर्चा आहे ती श्रीदेवी आणि बॉलिवूडचे लोकप्रिय चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्या लव्हस्टोरीची

बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची लव्हस्टोरी कोणत्याही फिल्मीस्टोरीपेक्षा कमी नाही. श्रीदेवीसोबत लग्न करायचं असेल तर आधी श्रीदेवी यांच्या आईंशी मैत्री करायला हवी हे बोनी कपूर यांना समजलं होतं. त्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यांनी श्रीदेवी यांच्या आईला इम्प्रेस करण्यास सुरुवात केली असं बोनी कपूर यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

त्याकाळी श्रीदेवी तुफान लोकप्रिय आणि आघाडीच्या अभिनेत्री होत्या. मात्र, त्यांच्या चित्रपटांच्या तारखा आणि अन्य प्रोफेशनल गोष्टी श्रीदेवी यांच्या आई पाहत होत्या. त्याचवेळी बोनी कपूर यांनी ‘मिस्टर इंडिया’साठी श्रीदेवींना ऑफर दिली. मात्र या चित्रपटासाठी श्रीदेवींच्या आईने १० लाख रुपये मानधन मागितलं. विशेष म्हणजे त्यावेळी १० नव्हे, तर ११ लाख रुपये देईन असं बोनी कपूर म्हणाले.

आणखी वाचा : गर्भवती असताना सैफसोबतच्या ‘सेक्स लाइफ’विषयी करीना कपूरने केलं भाष्य म्हणाली…

‘त्यावेळी श्रीदेवी या सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या. त्या एका चित्रपटासाठी अंदाजे ८ ते ९ लाख रुपये मानधन घेत होत्या. माझ्या चित्रपटात श्रीदेवी यांना घेण्यासाठी मी ११ लाख रुपये मानधन देईन असं म्हणालो. कदाचित माझं हे बोलणं ऐकून मी वेडा झालोय की काय असा त्यांचा समज झाला असेल. पण त्यावेळी मला श्रीदेवींशी लग्न करण्यासाठी प्रथम त्यांच्या आईला इम्प्रेस करणं गरजेचं होतं’, असं बोनी कपूर यांनी मुलाखतीत सांगितलं.

आणखी वाचा : ‘माधुरी दीक्षित दे, आम्ही लगेच इथून निघून जाऊ’, पाकिस्तानच्या मागणीला कॅप्टन विक्रम बत्रांनी दिले ‘असे’ उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, श्रीदेवी यांच्या प्रेमात असलेल्या बोनी कपूर यांचं पहिलं लग्न झालं होतं व त्यांना दोन मुलंदेखील होते. मात्र, त्यांनी पत्नी मोना यांच्यासमोर श्रीदेवीवर असलेल्या प्रेमाची कबुलीदेखील दिली होती. परंतु, बोनी कपूर यांनी श्रीदेवींना प्रपोज करण्यासाठी अनेक वर्ष घेतले. त्यांनी १९९४ साली श्रीदेवींना लग्नाची मागणी घातली आणि १९९६ मध्ये ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकली.