‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना दिसत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील या मालिकेतील जयदीप आणि गौरीच्या जोडीने चाहत्यांनी मनं जिकली आहेत. ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेत देवकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मिनाक्षी राठोड हिचा आज वाढदिवस आहे. मिनाक्षीच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री माधवी निमकरने एक पोस्ट शेअर केली आहे. तिची हो पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

अभिनेत्री माधवी निमकर ही या मालिकेत शालिनीची भूमिका साकारत आहे. ती सोशल मीडियावर कायमच विविध गोष्टी शेअर करत असते. नुकतंच माधवीने मिनाक्षीच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर मिनाक्षी राठोडसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यासोबत तिने तिला खास शब्दात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“दोन वर्ष होत आली आपण एकत्र काम करतोय…खूप मजा आली, तुझ्यासोबत सीन करताना खूप हसले. खूप स्पष्ट आहेस तू, कधी कधी बाहेरून थोडी कडक, पण आतून तितकीच प्रेमळ…खूप छान वेळ एकत्र घालवला आहे आपण… खूप सुख दुःख शेअर केली आहेत…खूप छान आठवणी आहेत तुझ्यासोबत…एक तुझ्यातील खूप आवडणारी गोष्ट म्हणजे कधी जजमेंटल झाली नाहीस…ऑन स्क्रीन असो किंवा ऑफ स्क्रीन…”

“तुझा स्वभावातला स्पष्टवक्तेपणा मला घ्यायला आवडेल…अशीच रहा कायम (जरा जास्त झालं का? असुदे, आज तुझा वाढदिवस आहे) मला आमचं हे मॅडहेड लयं आवडत. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवोत”, असे माधवीने या पोस्टमध्ये लिहिले आहे.

दरम्यान ‘सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत मिनाक्षी राठोड ही देवकीच्या भूमिकेत दिसत आहे. तर याच मालिकेत माधवी निमकरने शालिनी ही भूमिका साकारली आहे. या दोघींच्याही भूमिका प्रचंड चर्चेत आहेत. तसेच सध्या अनेक नवी वळणं येत असल्याचे पाहायला मिळत आहेत. या मालिकेत सध्या गौरीचं नवं रूप पाहायला मिळत आहे.

“द कश्मीर फाइल्समध्ये काहीही खोटं दाखवलेलं नाही”; चिन्मय मांडलेकरने मांडले रोखठोक मत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मालिकेतील गौरी ही साधीभोळी असली, तरी ही नवी गौरी मात्र अरे ला कारे करणारी असल्याचे दिसत आहे. नुकतंच गौरीने शालिनी वहिनी आणि मानसीला चांगलाच धडा शिकवल्याचे दिसत आहे. पहिल्याच दिवशी गौरीने शालिनी, जयदीप आणि मानसी यांना धमकी दिली आहे. यामुळे आता तिघांचेही धाबे दणाणले आहेत.