‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना दिसत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील या मालिकेतील जयदीप आणि गौरीच्या जोडीने चाहत्यांनी मनं जिकली आहेत. त्यासोबतच या मालिकेत शालिनी, मल्हार, देवकी, दादा, माई यांच्याही भूमिका चांगल्याच गाजताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत नवनवे ट्विस्ट अँड टर्न पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही मालिका टीआरपी रेसमध्ये कायमच टॉप १० मध्ये असल्याचे पाहायला मिळते.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील कथानकामध्ये येणारे विविध ट्विस्ट प्रेक्षकांनी खिळवून ठेवणारे आहेत. या मालिकेतील सर्वच कलाकार सोशल मीडियावर विशेष सक्रिय असल्याचे पाहायला मिळतात. या मालिकेत शालिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री माधवी निमकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकंतच माधवीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने एक व्हिडीओदेखील पोस्ट केला आहे.

“मला आमचं हे मॅडहेड…”, ‘देवकी’च्या वाढदिवसानिमित्त ‘शालिनी’ने दिल्या खास शुभेच्छा

माधवीने शेअर केलेल्या व्हिडीओत या मालिकेतील सर्व कलाकार जल्लोष करताना दिसत आहेत. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका ही टीआरपी रेसमध्ये पहिल्या क्रमांकावर आली आहे. त्यामुळे या मालिकेच्या सेटवर आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

पारंपरिक ते वेस्टर्न; ‘शालिनी’चा हटके अंदाज पाहिलात का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माधवीने या सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर करताना हटके कॅप्शन दिले आहे. पुन्हा नंबर १…, आम्ही पुन्हा आलो, असे तिने या व्हिडीओला कॅप्शन देताना म्हटले आहे. तिचा हा व्हिडीओ आणि कॅप्शन सध्या चांगलेच चर्चेत आहे. विशेष म्हणजे तिचा हा व्हिडीओ व्हायरल होतानाही दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छाही दिल्या आहेत.