शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. यासगळ्यावर सोशल मीडियावर सर्वसाधारण व्यक्ती नाही तर सेलिब्रिटींपर्यंत सगळेच प्रतिक्रिया देत आहेत. तर आता अभिनेता सुमीत राघवननं एकनाथ शिंदे यांनी केलेल्या एक ट्वीटवर प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा : …म्हणून ‘धर्मवीर’ चित्रपटातील शेवटचा ‘तो’ सीन होतोय व्हायरल

What Uddhav Thackeray Said About Loksabha Election ?
उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास! “आम्ही महाराष्ट्रात ४८ जागा जिंकू भाजपाची ४५ + ची संख्या…”
sunil tatkare on raj thackeray support,
“रायगडमध्ये मनसेची मोठी ताकद, त्यामुळे…”; राज ठाकरेंच्या पाठिंब्यानंतर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया
Udayanraje Bhosale, sharad pawar
“माझ्या बारशाचं जेवण…”, शरद पवारांच्या कॉलर उडवण्याच्या कृतीवर उदयनराजेंची प्रतिक्रिया
CM Eknath Shinde
शिवसेनेच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर, ‘या’ नेत्याचं नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा

सुमीतने एकनाथ शिंदे यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देत ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुमीत म्हणाला, “साहेब, तुमच्या यादीत ‘महाराष्ट्र हित’ चौथ्या क्रमांकावर आहे आणि माझा मुद्दा हाच आहे. शिवसैनिक भरडले जात आहेत, त्यांचे खच्चीकरण होत आहे. अनैसर्गिक आघाडी वगैरे हे सगळं बरोबर आहे, पण जो सामान्य माणूस आहे तो सदैव मागेच राहणार. तो जो ‘आता’ आहे ना त्या वाक्यातला तो वेदना देणारा आहे.”

आणखी वाचा : अडीच वर्ष का लागावी हा निर्णय घ्यायला? सुमीत राघवननं एकनाथ शिंदेंना केला प्रश्न

sumeet raghvan post for eknath shinde,
सुमीत राघवनने ट्विटर पोस्टवर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा : “आणखी कोणाला असं वाटतंय…”, जिनिलियाने शेअर केलेला ‘हा’ मजेशीर व्हिडीओ पाहिलात का?

आणखी वाचा : “काय मूर्खपणा चालला आहे! आपण…”, महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावर स्वरा भास्करची प्रतिक्रिया

काय म्हणाले होते एकनाथ शिंदे

गेल्या अडीच वर्षात घडलेल्या चार मुद्द्यांच्या आधारे एकनाथ शिंदे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, “गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा केवळ घटक पक्षांना झाला. यामध्ये शिवसैनिक भरडला गेला. एकीकडे घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे आणि शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत गेलं. पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणं अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचं आहे.