‘स्टुपिड मॅन, स्मार्ट फोन’ शोचे इंडियन व्हर्जन

Can You Survive Only With The Help Of A Smart Phone?

सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मची क्रेझ तरूणाईत चांगलीच दिसते. वेबसीरिज असो, एखादा टिव्ही शो किंवा रिअॅलिटी शो असो, स्मार्ट फोनच्या माध्यमातून कुठेही पाहता येतात. स्मार्ट फोन हा किती गरजेचा आहे किंवा कुठेही जगण्याचं साधन म्हणून स्मार्ट फोन वापरला जाऊ शकतो का असा प्रश्न बहुतेकदा पडतो. काही महिन्यांपूर्वी बीबीसी वाहिनीवर ‘स्टुपिड मॅन स्मार्ट फोन’ हा एक सरव्हायवल शो गाजला होता. केवळ एका स्मार्टफोनच्या आधारावर कुठल्या तरी जंगलात दिवस काढणे असा हा शो होता. हा शो आता भारतातही आला आहे. या शोच्या भारतीय व्हर्जनचे चित्रीकरण ‘बीबीसी वर्ल्डवाइड प्रॉडक्शन’ आणि ‘वूट’ संयुक्तपणे ४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या शोचं वैशिष्ट्य हे आहे की हा शो केवळ ‘वूट’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर दाखवला जाणार आहे.

वाचा : अमिताभ बच्चन यांना कोर्टाने नोटीस पाठवून विचारले, नवरत्न तेल ‘ठंडा- ठंडा कूल- कूल’ का आहे?

या शोचा प्रमुख चेहरा अर्थात सरव्हायवर असेल सुमित व्यास. सुमितची ‘परमनेन्ट रूममेट्स’ ही वेबसीरिज बरीच गाजली होती. ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘औरंगजेब’ या सिनेमात तसेच छोट्या पडद्यावरही सुमितने काम केलं आहे. बीबीसीवरील शोमध्ये रूसेल केन हा अभिनेता, ‘कॉमेडियन’ या शोचे सूत्रसंचालन करत होता. तर सुमित व्यास हा एक सरव्हायवर असेल ज्याच्यासोबत केवळ एक स्मार्टफोन, फोनची बॅटरी व फक्त शोसाठी गरजेच्या अशा काही वस्तू असतील. सुरूवातीला सुमितसोबत एक सेलिब्रिटी पार्टनर असणार आहे, जो त्याला तमिळनाडूतील एका जंगलात सोडेल. अशाप्रकारे आणखी दोन ठिकाणी या शोचे शूटिंग होणार आहे. एखाद्या निर्जन ठिकाणी स्मार्टफोन किती काम करेल व सोशल मीडिया सुमितला किती मदत करेल याची उत्सुकता आता प्रेक्षकांनाही असेल.

वाचा : वाढत्या वजनामुळे ‘साहो’मधून अनुष्काची एक्झिट तर या बॉलिवूड अभिनेत्रीची एण्ट्री