कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलं आहे. या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते आहे. गेल्या दोन वर्षाहून अधिक काळापासून सुरु असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. या मालिकेत अभिमन्यूची भूमिका अभिनेता समीर परांजपे साकारत आहे. नुकतंच अभिनेता समीर परांजपे याने आषाढी एकादशी निमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने एका गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

आज आषाढी एकादशीनिमित्त सर्वच कलाकार विविध पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. नुकतंच समीर परांजपे याने इन्स्टाग्रामवर तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल हे गाणं गातानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ जवळपास साडेतीन मिनिटांचा आहे. यात तो छान गाणं गाताना दिसत आहे.

अभिनेत्री अनिता दातेच्या ‘त्या’ फोटोमागील गुपित उलगडले, छोट्या पडद्यावर पुन्हा करणार पदार्पण

या व्हिडीओला त्याने हटके कॅप्शन दिले आहे. “तीर्थ विठ्ठल….खरं तर हे गाणं निभावणं अतिशय कठीण आहे. माझ्या सारख्याने वाटेला ही जाऊ नये या गाण्याच्या..पण विचार केला, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल आहे तर मग स्वर विठ्ठल लय ही विठ्ठल श्रुती विठ्ठल अनुभूती ही विठ्ठल..! चूकभूल द्यावी घ्यावी..!”, असे त्याने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. त्यावर अनेक कलाकार कमेंटही करताना दिसत आहे.

सुंदरा मनामध्ये भरली : ‘अभिमन्यू’च्या पत्नीविषयी काही खास गोष्टी

दरम्यान समीर परांजपेला पहिल्यापासूनच नाटक, एकांकिका आणि सांस्कृतिक क्षेत्राची आवड होती. त्यामुळे समीर हळूहळू कला क्षेत्राकडे वळला. इंजिनिअरिंग करत असताना अनेक एकांकिका आणि नाटकांमधून त्याचा अभिनय क्षेत्राचा प्रवास सुरूच होता. फिरोदिया करंडक स्पर्धेतून समीरच्या अभिनयाची झलक दिसली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अगदी सुरुवातीला समीरने राकेश सारंग यांच्या ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेत छोटे पात्र साकारले होते. या मालिकेतील एका छोट्या पात्रापासून समीरच्या कारकिर्दीला सुरुवात झाली होती. त्यानंतर गोठ, गर्जा महाराष्ट्र आणि अग्निहोत्र २ या मालिकेत त्याने नायकाची भूमिका साकारली. भातुकली या चित्रपटातही तो प्रमुख भूमिकेत दिसला होता.