बॉलिवूडचा अन्ना म्हणून अभिनेता सुनील शेट्टी ओळखले जातात. आज ११ ऑगस्ट सुनील शेट्टीचा वाढदिवस आहे. सुनील शेट्टी आजही त्याच्या फीटनेसमुळे ओळखला जातो. बऱ्याच वेळा सुनील शेट्टीला त्याच्या लूकमुळे ट्रोल करण्यात आलं आहे. तर एकदा सुनील शेट्टीला त्याच्या लूकमुळे दहशतवादी समजत पोलिसांनी अटक केली होती.
संजय गुप्ता यांचा २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांटे’ या चित्रपटातील लूकमुळे सुनील शेट्टीला पोलिसांनी अटक केली होती. या चित्रपटात सुनील एका बाऊंसरची भूमिका साकारत होता. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तो अमेरिकेला गेला होता. सुनील शेट्टी राहत असलेल्या हॉटेल पासून जीम लांब होती त्यामुळे तो रोज सकाळी ४ वाजता उठून जीममध्ये वर्कआऊट करायचा आणि मग चित्रपटाच्या सेटवर जात होता. एक दिवस सुनील शेट्टी जीमला तर गेला मात्र परत आला नाही.
आणखी वाचा : गर्भवती असताना सैफसोबतच्या ‘सेक्स लाइफ’विषयी करीना कपूरने केलं भाष्य म्हणाली…
View this post on Instagram
आणखी वाचा : छोट्या पडद्यावरील ही बोल्ड अभिनेत्री चक्क विकतेय मासे?
त्यानंतर सेटवर असलेली टीम सुनील शेट्टीला शोधण्यासाठी जीममध्ये गेली, तेव्हा त्यांना कळले की सुनील शेट्टीला पोलिसांनी अटक केली. मग संपूर्ण टीम ही पोलिस स्टेशनला पोहोलची. संजय गुप्ता आणि अमिताभ बच्चन यांनी पोलिसांना समजावले आणि त्यानंतर सुनील शेट्टीची सुटका झाली. या चित्रपटात सुनील शेट्टीसोबत संजय गुप्ता, अमिताभ बच्चन आणि कुमार गौरव मुख्य भूमिकेत होते.